Type Here to Get Search Results !

बुद्धांनी दिलेल्या शिकवणीचे आचरण करीत आजच्या तरुण पिढीने विज्ञानवादी व्हावे आ. शाहरुख पठाण सर





बुद्धांनी दिलेल्या शिकवणीचे आचरण करीत आजच्या तरुण पिढीने विज्ञानवादी व्हावे आ. शाहरुख पठाण सर "                                             
                                                    ता.हिमायतनगर :प्रतिनिधी एम. यु. हनवते 




 दि. 04/10/2022 वार मंगळवार रोजी हिमायतनगर तालुक्यातील कारला पी. येथे 'तक्षशिला बुद्धविहारात' धम्म चक्र प्रवर्तन दिना निमित्त्य 'पुरोगामी युवा ब्रिगेड' जिल्हा यवतमाळ प्रवक्ता आ. शाहरुख पठाण सर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता.त्यात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश टाकला .पुढे बोलताना आ.शाहरुख पठाण सर यांनी डॉ.बाबासाहेबानी आम्हाला 14 ओक्टोम्बर 1956 रोजी नागपूर येथे विज्ञानावर आधारित समस्त मानवी कल्याणाचे हित साधणारा बुद्धांचा धम्म आम्हाला दिला आपण त्याचे आचारण करायला हवे व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत कोल्हापूरच्या बिंदू चौकात बाबासाहेबांचा पुतळा कोणी उभारला असेलतर ते मराठा समाजातील व्यक्तीने उभारला आहे.त्या मुळे महामानवांना कोणत्या ही एका जातीत वाटून घेउ नका असे सांगत आजच्या तरुण पिढीने स्वतःच्या पायावर उभे राहत अभ्यासावर भर द्यावा असे मत व्यक्त केले. व्यास पिठावर उपस्थित त्यांच्या सोबत आलेले पुरोगामी युवा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवशंकर सुरोशे, सागर शेरे, ताहेरशहा, अनिल हरणे, भा. बौद्ध महा.प.सचिव एम. यु. हनवते सर इत्यादी उपस्थित होते. व त्याच बरोबर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील साईनाथ कोथळकर सर, सुनील घोडघे, सोपान बोम्पीलवार, गंगाराम वाघमारे, नागेश कांबळे , किसन रामा रावते, भगवान कांबळे, व समस्त गावातील गावकरी मंडळी महिला मंडळींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad