Type Here to Get Search Results !

बनोटी मंडळात वादळी वाऱ्याचा तडाखा...कपाशी पिके आडवी..




बनोटी मंडळात वादळी वाऱ्याचा तडाखा...कपाशी पिके आडवी.

वादळी वाऱ्याचा तडाख्यात पळाशी शिवारात आडवी झालेली कपाशी पिके, दुसऱ्या छायाचित्रात कपाशीचे झालेले नुकसान..




सोयगाव, दि.०४..सोयगाव तालुक्यात मंगळवारी दुपारी चार वाजे नंतर अचानक वातावरनात बदल होऊन बनोटी मंडळातील पळाशी,आणि मुखेड शिवारात अचानक वादळी वाऱ्याने धडक दिल्याने कापूस वेचणी करणाऱ्या मजुरांची धांदल उडाली होती, दरम्यान या वादळी वाऱ्यात पळाशी व।मुखेड शिवारात कपाशी पिके आडवी पडून नुकसान झाले आहे..
अतिवृष्टीच्या तडाख्यनंतर मंगळवारी दुपारी बनोटी मंडळातील पळाशी, मुखेड या शिवारात अचानक वादळी वाऱ्याचा तडाखा बसला यामध्ये पळाशी आणि मुखेड शिवारात कपाशी पिके आडवी झाली असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे,दरम्यान नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या तडाख्यात खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले होते,परंतु मंगळवारी पुन्हा वादळी वाऱ्याचा नैसर्गिक संकटांला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले आधीच परतीच्या पावसाने सोयगावला उसंत दिली असतांना पिकांची आकटोबर हिट मध्ये होरपळ होत आहे सध्या पिकांना पाण्याची गरज आहे त्यातच पावसाची उघडीप आणि वादळी वाऱ्याचा तडाखा यामुळे खरीप संकटात सापडला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad