सध्या महाराष्ट्रामध्ये लंपि या रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे सगळे शेतकरी बांधव चिंतेत आहे. नेहमी शासकीय यंत्रणेवर बोट दाखवल्या जात असते .
पण यंत्रणेचे नाव उंच करणारि बातमी टाकरखेडा संभु मधून आली आहे. येथील पशू वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास झेडपे साहेब आणि त्यांची टीम जे काम करत आहे यामुळं शासकीय यंत्रणा एकदा परत नावसुरुप येत असून डॉक्टर साहेबांच्या टीम चे सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.
अधिकारी डॉक्टर विलास झेडपे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार,
गावामधे जनावरांमध्ये लक्षणे दिसू लागताच त्यांनी सर्वात आधी गावामधे 100 टक्के फवारणी केली. भातकुलि तालुक्यामध्ये सर्वात आधी फवारणी करणारे गाव ठरले टाकरखेडा संभु ठरले आहे. गावातील बरेच जनावरे आता बरी झाली असून प्रदुभवावर सध्या तरी नियंत्रण आहे अस म्हणता येईल.
फवारणी साठी औषधी सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यातून मोफत पुरवल्या गेल्या.
तसेच रोज त्यांची प्रत्येक गावमधे घरी जाऊन भेट देतात आणि लक्षण आढल तर तिथे उपचार करून देतात.
उत्कृष्ट पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून ते एकदा सन्मानित सुद्धा केल्या गेले आहेत.
गावातील शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांचे अजूनही युद्ध स्तरावर शर्तीचे प्रयत्न सुरूच आहे.
अशे कर्तव्यनिष्ट डॉक्टर गावाला मिळाले म्हणून गावकरी समाधानी आहेत.