Type Here to Get Search Results !

श्री कालिंका माता देवी एक जागरूक देवस्थान नवरात्र महोत्सव काळात 9 दिवस हजारो भाविक भक्तांना मोफत जेवणाची व्यवस्था.




श्री कालिंका माता देवी एक जागरूक देवस्थान नवरात्र महोत्सव काळात 9 दिवस हजारो भाविक भक्तांना मोफत जेवणाची व्यवस्था.

हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे






श्री कालिंका देवी मातेच्या दरबारात दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी केली जाते या नवरात्र उत्सवाच्या आठव्या माळे निमित्त दिनांक 3 ऑक्टोबर रोज सोमवारी भोकर पोलीस उपविभागीय अधिकारी अर्चना पाटील मॅडम यांनी शहरातील जागरूक व नवसाला पावणाऱ्या श्री कालिंका मातेचे दर्शन घेऊन मनोभावे प्रार्थना केली 




  यावेळी उपस्थित ट्रस्ट कमिटीच्या संचालकांनी त्यांना असे सांगितले की कालिंका देवीची शेकडो वर्षाची ऐतिहासिक नवरात्र महोत्सवाची परंपरा असल्याने नवरात्र महोत्सव काळात येथे 9 दिवस दररोज हजारो महिला भाविक भक्त दर्शन आणि महाप्रसादासाठी मोठी गर्दी करत असतात तेव्हा कालिंका देवी समितीच्या वतीने या सर्व भाविक भक्तांची स्वयंसेवक मंडळी कडून दररोज सायकाळी 7 च्या आरती नंतर हजारो महिला भाविक भक्तांना भव्य महाप्रसादाचे मोफत जेवण देऊन एक अतिशय आगळा वेगळा उपक्रम राबून येणाऱ्या भाविक भक्तांना निस्वार्थ भावनेने सेवा दिली जाते व भक्ती मय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न केला जातो त्यामुळे शहरातील जागरूक व नवसाला पावणाऱ्या श्री कालींका देवी मातेचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील येणाऱ्या भाविक भक्तांनी ह्याचा आवश्य लाभ घावा असे आव्हान श्री कालींका देवीचे विश्वस्त अध्यक्ष राजेंद्र रामदीनवार,दिलीप पारडीकर,संजय मारावार सर,गजानन तीप्पनवार, ज्ञानेश्वर पंदलवाड,नारायण गुंडेवार,शरद चायल ,राजू जैसवाल, गजानन चायल, योगेश चिल्कावार,विनोद गुंडेवार, विष्णू रामदीनवार, योगेश गुंडेवार, सांहील गुंडेवार ,गणेश रामदीनवार,प्रकाश रामदीनवार,सोनू मादसवार,प्रशांत गुंडेवार,राज सेवनकर, सह आदी जणांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad