निराधार महिलेला ‘यारी दोस्ती ग्रुप’ कडून किराणा कीट ची मदत
पालघर प्रतिनिधी - दिनेश आंबेकर
विक्रमगड : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील वेहेलपाडा (पासोडीपाडा ) येथील जयणी गोविंद कान्हात या महिलेला ‘यारी दोस्ती ग्रुप’ कडून किराणा कीट ची मदत करण्यात आली.सदर महिला ह्या निराधार असून त्यांना उदार निर्वाह करताना खूपच अडचणीचा सामना करावा लागतो आहे. तसेच या महिलेला राहायला एक लहान झोपडी होती पण या जोरदार पावसात तिची झोपडी सुध्दा मोडून पडली आहे, म्हणून तिला दुसऱ्यांच्या घरी ओटीवर झोपावे लागत आहे. ही महिला एकटीच आणि निराधार असून या महिलेला लहानशा आधार मिळावा म्हणून ‘यारी दोस्ती ग्रुप’ वर मदत करण्याचा मेसेज आला होता.
सदर महिला ह्या निराधार असून त्यांना उदार निर्वाह करताना खूपच अडचणीचा सामना करावा लागतो आहे. तसेच या महिलेला राहायला एक लहान झोपडी होती पण या जोरदार पावसात तिची झोपडी सुध्दा मोडून पडली आहे, म्हणून तिला दुसऱ्यांच्या घरी ओटीवर झोपावे लागत आहे. ही महिला एकटीच आणि निराधार असून या महिलेला लहानशा आधार मिळावा म्हणून ‘यारी दोस्ती ग्रुप’ वर मदत करण्याचा मेसेज आला होता.
या मेसेज ची दखल यारी दोस्ती ग्रुप चे सदस्य आज त्या महिलेच्या गावात जावून तिला प्रत्यक्ष भेटून ही किराणा कीट देवून एक कर्तव्य म्हणून छोटीशी मदत पुरवण्यात आली.