Type Here to Get Search Results !

भिवंडी वाहनचोरी, मोबाईल चोरी च्या 16 गुन्ह्यांची उकल,11 दुचाकी ,23 मोबाईल जप्त करण्यात शांतीनगर पोलिसांना यश




भिवंडी वाहनचोरी, मोबाईल चोरी च्या 16 गुन्ह्यांची उकल,11 दुचाकी ,23 मोबाईल जप्त करण्यात शांतीनगर पोलिसांना यश




भिवंडी शहरात वाहन चोरीच्या घटना वाढल्या असताना शांतीनगर पोलिसांनी चार आरोपींच्या मुसक्या आवळत 11 दुचाकी 23 मोबाईल दोन चैन स्नेचिंग अशा 16 गुन्ह्यांची उकल करीत 8 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे .शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची वेगवेगळी पथके वाहन चोरी मोबाईल चोरी व चैन स्नाचिंग च्या दाखल गुन्ह्यांचा तपास करीत असताना या पथकाने सुनील उर्फ सोन्या शंकर फुलारे वय 20 रा.लहुजीनगर,कल्याण,आयाज अली रेहमतअली अन्सारी वय 38 रा.चिरागनगर घाटकोपर,दाऊद शोएब अन्सारी वय 28 रा गुलजार नगर भिवंडी, सर्फराज रेहमतअली खान वय 26 रा.भिवंडी या चार जणांच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातून 11 दुचाकी , 1 रिक्षा, दोन सोन्याच्या चैन व 23 चोरीचे मोबाईल असा एकूण 8 लाख 17 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत शांतीनगर येथील 13 ,शहर पोलीस ठाण्यातील 2,नारपोली पोलीस ठाण्यातील 1 अशा एकूण 16 चोरीच्या गुन्ह्याची उकल केली आहे.विशेष म्हणजे चोरीचे हे सर्व मोबाईल नेपाळ या ठिकाणी विक्री साठी पाठविले जात असताना जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad