Type Here to Get Search Results !

हिमायतनगर तालुक्यात लंपी स्किन आजारी गोवंश कळवा व घरपोच उपचार मिळवा




हिमायतनगर तालुक्यात लंपी स्किन आजारी गोवंश कळवा व घरपोच उपचार मिळवा

हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे

हिमायतनगर तालुक्यात पशुसंवर्धन विभागामार्फत गोवंश जनावरांचे 100% लसीकरण करण्यात आले आहे. एकूण प्राप्त लस 15200 असून त्यापैकी 15100 लस गोवंशास लावण्यात आली आहे.काही शेतकऱ्यांनी पशुधनचे लसीकरण घेतले नसतील तर तात्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यात भेट देऊन लसीकरण करून घ्यावे.


 तसेच हिमायतनगर तालुक्यामध्ये सध्या परिस्थितीला लंपी बाधित गोवंश नाही. तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की आपल्या गाय-बैल यांच्या अंगावर मोठी पुरळ किंवा गुदी दिसून आल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात भेट देऊन कळवावे. खाजगीत उपचार न करता पशुवैद्यकीय अधिकारी हिमायतनगर डॉ उमेश सोनटक्के, मोबाईल नं 9405002016किंवा जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कळवावे घरपोच उपचार करून घ्यावा ही विनंती.
लंपी बाधित जनावर असल्यास तात्काळ कळवावे. खाजगीत उपचार करून घेऊ नये. शासनास कळवणे बांधनकारक आहे यांची सर्व हिमायतनगर शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी

खाजगी सेवादाता यांना कळवण्यात येते की आपण लंपी रुग्ण दिसताच नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना संस्था प्रमुख यांना कळवावे. आपण जाणीवपूर्वक न कळवता उपचार केल्यास व जनावर मृत्यू झाल्यास लाभार्थी लाभापासुन वंचीत राहिल्यास सर्वस्व जबाबदार धरण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News