जरंडिचे ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार घेतांना
प्रतिनिधी:- बाळू शिंदे
सोयगाव, दि.०३..पाटोदा आणि हिवरेबाजार ग्रामपंचायत च्या धर्तीवर जरंडीच्या विकासाचे पाऊल उचलणाऱ्या जरंडी ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांना जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आला या पुरस्काराचे वितरण मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ निलेश गटणे,व नव्याने रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना यांच्या हस्ते रविवारी देण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने जरंडी गावात ७५ विविध विकासाभिमूक उपक्रमासह गावाला आयडियल जरंडी बनविण्यासाठी ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांनी गावात सी सी टी व्ही,पीठ गिरणी, व्यायाम शाळा, आठ हजार वृक्षांची लागवड व संगोपन, ग्रामपंचायत च्या मुख्य प्रवेशद्वारात ग्रामस्थांना विविध उपक्रमांचा डिजिटल सूचना फलक,शुद्ध पाणी पुरवठा, दिव्यांगा ना मोफत शूद्र पाणी व जार,आदी उपक्रम राबवित शिक्षणाचा पाया उंचगविण्यासाठी प्राथमिक शाळांचा विकास,त्यामध्ये संगणक प्रयोगशाळा,७५ गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक योजना आदी उपक्रम गावात राबवून यासाठी सरपंच वंदनाताई पाटील,उपसरपंच संजय पाटील,दिलीप पाटील,माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, मधुकर पाटील,मधुकर सोनवणे, प्रकाश पवार आदींनी हातभार लावला त्यामुळेच जरंडी ग्रामपंचायत पाटोदा आणि हिवरेबाजार ग्रामपंचायत च्या वाटेवर आली आह ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांनी जरंडी ग्रामपंचायतला आयडियल ग्रामपंचायत केली आह त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना आदर्स ग्रामसेवक पुरस्कार दिला आहे.