पालघर जिल्हा प्रतिनिधी: सुनिल जाबर
जव्हार :- भारताचे पूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए .पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जात असून जव्हार तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेली शासकीय व माध्यमिक आश्रम शाळा दाभेरी या शाळेत शिक्षक व विद्यार्थी एकत्र येऊन वाचन प्रेरणा दिवस साजरा करून प्रत्येकाला वाचनाची आवड व्हावी हा संदेश दिला आहे.
दाभेरी आश्रमशाळेत इयत्ता १ते १२ वी पर्यंतचे वर्ग असून या शाळेमध्ये एकूण ८३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या वर्षी देखील या शाळेमध्ये चांगल्या प्रकारे १२ वी चा निकाल लागला आहे.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री जामानिक सर तसेच पाटील सर, क्रिडा शिक्षक गोरे सर व महाले सर व इतर सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते.