भातकुलीं प्रतिनिधी - वैभव भूजाडे
टाकरखेडा संभु येथील वॉर्ड क्र 1 मधून अचंबित करणारी बातमी सध्या समोर आली आहे.या वॉर्ड मधे काही नाल्या अदृश्य झाल्या आहेत. त्यामुळं घरचं सांडपाणी कुठे सोडावं हा प्रश्न नागरिकांसमोर आहे. काही नाल्या ह्या सध्या जागेवर थांबल्या आहेत .त्यामधील सांडपाणी वर्षानुवर्ष एकाच जागेवर थांबून आहे.त्यामुळं ही परिस्थिती एखाद्या मोठ्या रोगाला निमंत्रण देऊ शकते.पण स्थानिक प्रशासन मात्र या विषयावर तोंडावर बोट ठेवून आहे.
या अश्या अवस्थेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.त्यामुळं या परिस्थितीला शासन जबाबदार आहे .या विषयावर ग्रामपंचायत मधील सरपंच मॅडम सोबत संपर्क होऊ शकला नाही.तसेच गावातील समस्या कोणापुढे मांडायच्या असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.