धानोरा (ज.) ता.कळमनुरी जि.हिंगोली येथिल सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे हिंगोली जिल्हा सहसंपर्क संघटक ॲड.रवि शिंदे यांचा पँनल विजयी झाला होता.
आज दि.१४ आँक्टोबर २०२२ रोजी सहाय्यक सहकारी निबंधक कार्यालयाचे तालुका सेक्रेटरी गजानन शिंदे हे पिठासीन अधिकारी व सहाय्यक श्री.गाभणे यांच्या उपस्थित ग्रामपंचायत कार्यालय,धानोरा (ज.) येथे चेअरमन निवडीची प्रक्रिया पारपडली.यामध्ये धानोरा (ज.) ता.कळमनुरीच्या चेअरमनपदी बंडू कोरडे व व्हाईसचेअरमन पदी अशोकराव मस्के नाईक यांची बिनविरोध निवड झाली.
तर सोसायटीचे संचालक म्हणून तोलाजी रामजी खुडे ,ग्यानबा वामन कांबळे,लक्ष्मण कचरू खुपसे,भिमराव सुदाम पाईकराव ,रंगराव किशन कोरडे,पांडुरंग गणपती भागवतकर,रामेश्वर हरिभाऊ कोरडे,राजू देवबा जाधव,सौ.शोभाबाई पुंजाराव मस्के ,श्रीमती देवकाबाई खुपसे यांची निवड झाली.
यावेळी गावचे उपसरपंच लक्ष्मण पोटे,तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल्ल पाईकराव ,माजी सरपंच होनाजी पोटे,माजी उपसरपंच सुनिल पाईकराव ,मोतिराम मोरे,फेरोजखान पठाण ,माणिक चिरमाडे ,निस्सारखाँ पठाण ,पुंजाराव मस्के ,चंदन पाईकराव ,मनानखाँ पठाण ,गौतम ढबाले ,दिनकर पाईकराव ,भगवान पोटे,धनाजी इंगळे ,शामराव कोरडे,पिलाजी कोरडे,मारोती कोरडे,बबन कोरडे,कैलास कोरडे,सुहास मस्के ,सावन मस्के ,अरविंद मस्के ,वैभव मस्के आदी उपस्थित होते.