भातकुली प्रतिनिधी - वैभव भूजाडे.
शासनामार्फत दिवाळी निमित्त आनंदाचा शिधा ही योजना राबवण्याचा निर्णय शासनाने केला होता. या योजनेमधे चना डाळ 1 किलो, रवा 1 किलो , साखर 1 किलो आणि पामतेल 1 किलो हे सर्व साहित्य या योजने मधे येणार होत. पण अजून पर्यंत या योजनेची कोणतीही वस्तू टाकरखेडा संभु येथील सरकारी धान्य दुकानांमध्ये आलेली नाही.त्यामुळं ही योजना दिवाळी साठी आहे की होळी साठी असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. अशा उदासीन धोरणेमुळ शासकीय कामावर एकदा परत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.