Type Here to Get Search Results !

पालघर जिल्ह्यातील ३४२ सरपंचपदासाठी १३४९ तर ३४९० सदस्यपदासाठी ७४०२ उमेदवार रिंगणात




पालघर जिल्ह्यातील ३४२ सरपंचपदासाठी १३४९ तर ३४९० सदस्यपदासाठी ७४०२ उमेदवार रिंगणात

जव्हार प्रतिनिधी : सुनिल जाबर

पालघर जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ३४२ सरपंचपदासाठी १३४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात तर ३४९० सदस्य पदासाठी ७४०२ उमेदवार रिंगणात आहेत.काही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच बिनविरोध झाले आहेत.सर्वच ग्रामपंचायतीमध्ये अटीतटीच्या लढती असून सेना विरूध्द भाजपा शिंदे गट लढती होणार आहेत.
      अनेक ठिकाणी विविध पक्षांनी एकत्रित येऊन परिवर्तन पॅनल तयार केले .१६ ऑक्टोबर ला होणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अजूनपर्यंत प्रचार होताना कुठे दिसत नाही.उमेदवार वैयत्तीक भेटी घेवून मतदारा पुढे जात असल्याचे चित्र सर्व ठिकाणी पहावयास मिळत आहे.
     जिल्यातील सरपंच पदासाठी रिंगणात असलेले उमेदवार : १)जव्हार तालुका - ४७ सरपंच पदासाठी १८९ उमेदवार २)मोखाडा तालुका - २२ सरपंच पदासाठी १०३ उमेदवार ३)विक्रमगड तालुका - ३६ सरपंच पदासाठी २०० उमेदवार ४) वाडा तालुका - ७० सरपंच पदासाठी २२९ उमेदवार ५) डहाणू तालुका -६२ सरपंच पदासाठी २८९ उमेदवार ६) तलासरी तालुका - ११ सरपंच पदासाठी ३५ उमेदवार ७) पालघर तालुका - ८३ सरपंच पदासाठी २७३ उमेदवार ८)वसई तालुका - ११ सरपंच पदासाठी ३१ उमेदवार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad