पालघर प्रतिनिधी - दिनेश आंबेकर
भीम आर्मी प्रमुख भाई चंद्रशेखर आझाद (रावण ), राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंगजी च्या आदेशानुसार, महाराष्ट्र प्रमुख नेहा ताईसाहेब व राष्ट्रीय नेते अशोकजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाने भीम आर्मी पालघर जिल्हाच्या वतीने बहीण मनीषा वाल्मिकीला न्याय मिळावा व दोषींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून भीम आर्मीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन व BARC गेट ते बोईसर रेल्वे स्टेशन पर्यंत रॅली काढली आणि मेणबत्ती प्रज्वलीत करून मनीषा वाल्मिकीला श्रद्धांजली वाहिली.
या कार्यक्रमाचे नेतृत्व भीम आर्मीचे कोकण प्रदेश अध्यक्ष मा. अशोकदादा शिंगाडा, जिल्हाध्यक्ष अविनाश गायकवाड, जिल्हा संघटक गणेश कलिंगडा, जिल्हाउपाध्यक्ष राजन सोनावणे, जिल्हा सचिव फिरदोस सुरती, जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष अमर वाघ, मोखाडा तालुका अध्यक्ष जयराम तुंबडा, तालुका अध्यक्ष फिरोज नवाब, तालुका संघटक जगन खुताडे, शहर अध्यक्ष सिद्धू वाघमारे व शेकडो कार्यकर्ते मिळून केले. जय भीम..
अशोकदादा शिंगाडा
कोकण प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य