जव्हार प्रतिनिधी – दिनेश आंबेकर
जव्हार : जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथ/माध्य) पालघर व शिक्षण विभाग पंचायत समिती जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने के. व्ही.हायस्कुलचे आर वाय. ज्युनि. कॉलेज जव्हार येथील गं.भा. सरदार हॉल मध्ये पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, वाडा, विक्रमगड या चार तालुक्याचे सर्व व्यवस्थापनाच्या शाळेच्या मुख्याध्यापकांची सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सहविचार सभेस मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय अध्यक्ष मुंबई विभाग मा श्री. नितीन उपासने साहेब यांनी परिक्षा कामकाज, कॉफीमुक्त अभियान, परिक्षा तणाव, परिक्षा पद्धती विषयी सविस्तर व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच कॉलेज मधील विद्यार्थाना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या सोबत श्री सतीश सावंत साहेब (अधिक्षक वाशी बोर्ड मुंबई) यांनी देखील ppt च्या माध्यमातुन बोर्डा च्या कामकाजासंदर्भात उपयुक्त माहिती सांगितली या कार्यशाळेमुळे पंचकोशीतील माध्यमिक, उच्च माध्यमिक परिक्षा पद्धती सुधारण्यास मदत मिळेल.
यावेळी या सहविचार सभेचे प्रास्ताविक मा श्री अमोल जंगले साहेब, गटशिक्षणााधिकारी पंचायत समिती जव्हार यांनी केले. तसेच या सहविचार सभेसाठी मा श्री पुंडलिक चौधरी साहेब शिक्षण विस्तार अधिकारी हे उपस्थित होते हि सहविचार सभा यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य श्री उदमले सर व त्यांच्या टिमच्या माध्यमातुन चांगले सहकार्य मिळाले तसेच श्री अल्मेड़ा रॉबर्ड सर जिल्हा समन्वयक पालघर यांनी मान्यवरा च्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप केले त्याच्या सोबत श्री प्रफुल्ल लवगें सर ,वरिष्ठ लिपिक (माध्य) जि प पालघर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री संतोष मुकणे यांनी केले.