कंधार प्रतिनिधी विठ्ठल कतरे पांगरेकर
कंधार येथील नग्रेश्र्वर मंदिरात दुर्गादेवी महोत्सवानिमित्त आरती आणि रास दांडिया नाईटस कार्यक्रमास शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे उपस्थित राहून सर्वप्रथम दर्शन घेऊन आरती केली व रास दांडिया कार्यक्रमांच्या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना आशाताई म्हणाल्या की,प्रत्येक स्त्री ही लक्ष्मी,सरस्वती आणि महाकाली चे रुप असते आपण स्वतःला कधीच कमी समजू नये सकारात्मक विचार करून आयुष्यात पुढे पुढे पाऊल टाकत जाऊन यशस्वीतेकडे मार्गक्रमण करावे.
यावेळी आयोजकांच्या वतीने सौ. आशाताई यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व कंधार शहरात फक्त महिलांना प्रवेश देऊन एक अनोखा उपक्रम खास महिलांसाठी दांडिया खेळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्याबद्दल आयोजकांची स्तुती आशाताई यांनी केली याप्रसंगी आयोजक शिवा भाऊ मामडे सह रास दांडिया नाईटस सर्व पदाधिकारी,
अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख शेरु भाई,महेश पिनाटे सह कार्यकर्ते,महिला व दांडिया स्पर्धक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते