अर्धापूर पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या बालाजी नवरात्र उत्सवाचे परंपरा प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही जोमाने सुरू आहे,
दररोज सकाळी 6 वा श्री बालाजीला रुद्र अभिषेक व 7 वा,आरती होते सकाळी 10 ते 12 या वळेत व्यंकटेश विजय ग्रंथाचे पारायण व दुपारी 12 वा विशेष आरती होऊन महाप्रसाद व अन्नदान वाटप करण्यात येते सायंकाळी 7 वाजता आरती होऊन लगेच 7 ते 10 या वेळात भजन कीर्तन व प्रवचन इतर धार्मिक कार्यक्रम होतात. हे सर्व कार्यक्रम बालाजी मंदिराचे मुख्य पुजारी गजू महाराज पळसकर तसेच लक्ष्मीकांत मुळे ( गुरु) यांच्या मार्गदर्शना खाली होतात.
बालाजी मंदिराचे अध्यक्ष जगदीश भुतडा,प्रवीण देशमुख,शामराव देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते व शेवटी विजय दशमीच्या दिवशी सकाळी 9 ते 12 यावेळेस अर्धापूर येथील मुख्य रस्त्याने श्री बालाजी ची विशेष पालखी निघून. ठीक 12 वा महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप होते सायंकाळी 8 वा बालाजी ची शेज आरती होऊन नवरात्र महोत्सवाची सांगता होते.
नवरात्र महोत्सव कार्यक्रमा सहकार्य शंकर पांचाळ,कोंडीबा आंबेगावकर, मधुकर जवादवार,पंपट्वार,पिराजी साखरे,माधव साखरे,नामदेवराव माटे, बालाजी मोटरवार,राजेश पळसकर व समस्त ग्रामस्थांचे सहकार्य लाभते आहे.