कंधार लोहा प्रतिनिधी विठ्ठल कतरे
कंधार तालुक्यातील कौठा सेवा सहकारी सोसायटी कौठा चेअरमन पदा साठी ग्राम पंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली यात प्रताप देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिन विरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक अधिकारी ए,के कोकणे यांनी जाहिर केले.
कौठा सेवा सहकारी सोसायटी चेअरमन पदाची निवडणूक दि ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वा ग्राम पंचायत कार्यालय कौठा येथे निवडणूक निर्णय अधिकारी ए.के.कोकणे रामकिशन डूमणे यांच्या नियंत्रणा खाली घेण्यात आली. प्रताप देशमुख याचा १३ सदस्या पैकी चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज प्रताप देशमुख याचा अर्ज आल्याने त्यांची बिन विरोध निवड करण्यात आल्याचे घोषीत करण्यात आले यानिवडीचे जिल्हा परिषद सदस्य विजय धोडंगे शिवकुमार देशमुख खुशाल कापसे उपसरपंच गंगाधर हात्ते भुजंग देशमुख प्रभाकर पांडे व्यकंटराव घोरपडे आदिने नवनिर्वाचित चेअरमन प्रताप देशमुख यांना शुभेच्छा दिल्या