जव्हार प्रतिनिधी - दिनेश आंबेकर
पालघर - जव्हार शहरातील पतंग शाह उपजिल्हा रुग्णालय जव्हार येथे गुरुवारी मोफत दंत व वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये 931 रुग्णांनी लाभ घेतला आहे.
या शिबिरात लोकमान्य टिळक सायन हॉस्पिटल मुंबई, येथील तज्ञ डॉक्टरांकडून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया जसे हर्निया, हायड्रोसिल आणि गाठ काढणे व लहान बालकांच्या शस्त्रक्रिया करण्याकरिता तपासणी करण्यात आली
13 ते 14 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या शिबिरात 13 तारखेला रुग्ण तपासणी,औषधोपचार करण्यात आले असून 14 तारखेला रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी जव्हार शहर तथा तालुक्यातील ग्रामीण व अतिदुर्गम भागातून रुग्ण दाखल झाले होते त्यापैकी, पुरुष 269, महिला 329, बालके 264 व मुली 69 अश्या एकूण 931 रुग्णांनी मोफत शिबिराचा लाभ घेतला असल्याची माहिती पतंग शहा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड यांनी दिली आहे.