या वार्ड मधून सत्ताधाऱ्यांना वोटिंग मिळतं नाही त्यामुळं इथलं प्रशासन सावत्रपणाची वागणूक या नागरिकांना देत आलेलं आहे. पावसाळ्यामध्ये नागरिकांना, शाळेतील लहान मुलांना येणं - जान करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. 2 दिवसा आधी या रस्त्यावर 3 ते 4 महिला पाय घसरून पडल्या. तरी पण शासन जैसे थे. या शासनाला रक्षक म्हणायचं की भक्षक असा प्रश्न नागरिकांना पडला.जाणीवपूर्वक गावातील एका भागात विकास काम पूर्णपणे थांबवून ठेवले आहे . तसेच पाण्याचा प्रश्न गावामधे एक वर्षापासून थैमान घालून आहे. वारंवार तक्रारी करून पाण्याचा प्रश्न अजून सुटला नाही. तसेच इथली ग्रामपंचायत वर मनमानी कारभार, भ्रष्टाचार या सर्व तक्रारी या नागरिकांनी केल्या.
महत्वाचं - कुठलाही ग्रामपंचायत चां ठराव नसताना रस्त्याचे बांधकाम करणे , जिथे काम नाही तिथे परत रस्ता काम करणे,
गावातील वॉर्ड क्र 1, 2 , 3 मधे रस्त्याचे वारंवार गरज नसताना सुद्धा काम झाले आणि पांढरी पुरा वॉर्ड क्र.4 मधे 24 वर्षापासून त्या रस्त्याकडे एकही नेत्याने ढुंकून सुद्धा बघितले नाही. पाणी हा जीवनावश्यक वस्तू मधे मोडते. पाण्याचं राजकारण आता गावामधे व्हायला लागलं असे एवढे आरोप गावकऱ्यांनी केले.
वसू महाराज यांनी नागरिकांना आश्वासन दिले, की या रस्त्याचे बांधकाम ते लवकरात लवकर करून देतील , तसेच ग्रामपंचायत वरील भ्रष्टाचार बाबत प्रशासनाची भेट घेऊन रीतसर चौकशी करून गुन्हा दाखल करायला लावू असे आश्वासन दिले.