सोयगावचे तहसीलदार रमेश जसवंत
सोयगाव, दि.०२.केंद्र शासनाच्या किसान सन्मान योजनेत राज्यात सोयगाव तहसिल कार्यालयाची कामगिरी दमदार ठरली असून सोयगाव तहसिल कार्यालयने किसान सन्मान योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांची आधार अप लोडिंग व नवीन लाभार्थी नोंदणी विहित मुदतीत ९९ टक्के पूर्ण केल्याने राज्यात सोयगाव तहसिल अव्वल ठरले आहे.त्यामुळे किसान सन्मान योजनेत सोयगावच्या तहसिल कार्यालयाचा शिक्का केंद्र सरकारच्या दरबारी नोंदविला गेला आहे.या कामगिरी बद्दल कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव तहसीलदार रमेश जसवंत यांचा सत्कार करून राज्यात अव्वल ठरलेला तहसीलदार रमेश जसवंत यांची नोंद करण्यात आली आहे तहसीलदार रमेश जसवंत यांनी शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा हप्ता नियमित मिळावा यासाठी केंद्र शासनाने नव्याने घालून दिलेल्या अटी, शर्थीचे पालन करून दिलेल्या मुदतीत लाभार्थ्यांची आधार अपलोडिंग पूर्ण करून मिळणाऱ्या बारावा हप्त्यासाठी लाभार्थ्यांची रस्ता मोकळा करून दिला आहे त्यामुळे आगामी महिन्यात लाभार्थ्यांना मिळणार बारावा हप्ता राज्यात सोयगाव तालुक्यात मिळणार आहे.या कामा बद्दल कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी तहसीलदार रमेश जसवंत व तहसिल कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.