बनोटी मंडळात अतिवृष्टीच्या नुकसानीची संयुक्त पंचनामे सुरू,दुसऱ्या छायाचित्रात फर्दापुर मंडळात पंचनामे करतांना कृषी व महसूल पथक.
सोयगाव, दि.२३...सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीच्या नुकसानीच्या पिकांच्या नुकसान भरपाई साठी शुक्रवारी( दि.२३) तालुका प्रशासनाच्या महसूल आणि कृषीच्या पथकांनी संयुक्त पंचनामे मोहीम हाती घेतली मात्र सोयगाव आणि जरंडी मंडळात अतिवृष्टीच्या नुकसानीची पंचनामे मोहीम हाती न घेण्यात आल्याने या दोन्ही मंडळांना पंचनाम्यांच्या मोहिमेतून वगळले असल्याची माहिती हाती आली आहे त्यामुळे या दोन्ही मंडळातील बाधित शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
सोयगाव तालुक्यात रविवारी रात्री आणि सोमवारी अतिवृष्टी च्या पावसाची नोंद चारही मंडळात घेण्यात आली होती.यासाठी झालेल्या नुकसानीची वस्तू दर्शक पंचनामे करण्याचे आदेश गुरुवारी मिळताच तालुका प्रशासनाच्या महसूल आणि कृषी यंत्रणांनी बनोटी व फर्दापुर या दोन मंडळात नुकसानीची पंचनामे करण्यासाठी तलाठी व कृषी सहायक थेट बांधा वर पोहचले,मात्र सीयगव आणि जरंडी मंडळात मात्र तलाठी कार्यालये कुलूपबंद अवस्थेत आढळुन आली तर कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या मंडळातील गावांना भेटीही दिल्या नव्हत्या, त्यामुळे अतिवृष्टीच्या पंचनाम्यांतुन सोयगाव, जरंडी ही दोन्ही मंडळे वगळण्यात आल्याची शुक्रवारी दिवसभर चर्चा होती,प्रत्यक्षात मात्र सोयगाव मंडळात रविवारी रात्री झालेल्या पावसाची ९० मी
मी तर जरंडी मंडळात ७८.७५मी मी इतकी नोंद झालेली आहे.
जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी गुरुवारी दिलेल्या पंचनामे आदेशात नमूद केले आहे की जून ते पाच सप्टेंबर या कालावधीत पिकांचे नुकसानीबाबत बाधित क्षेत्राचा पंचनामे झाले असल्यास त्या बाधित क्षेत्राचा पुनरपंचनाम करू नये असे या आदेशात म्हटले आहे,परंतु दिलेल्या मुदतीच्या कालावधीत या दोन्ही मंडळांचा पंचनामे झालेले नाहीत मग सोयगाव, जरंडी मंडळांना कोणत्या निकषांवर वगळले असाही प्रश्न बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे त्याहून अधिक म्हणजे सोयगाव तालुक्यात नुकसानीची पंचनामे आदेशात नमूद केले आहे की,अतिवृष्टी अथवा सतत पाऊस यामुळे बाधित झालेल्या पिकांचेही नुकसानीची पंचनामे करावे,या निर्देशानुसार सोयगाव आणि जरंडी या दोन्ही मंडळात सप्टेंबरमध्ये सतत तेरा दिवस किरकोळ पाऊस झाल्याचा नोंदी महसूल व कृषी विभागाकडे असून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासन कडे सुपूर्द करण्यात आलेला आहे परंतु पंचनामे प्रक्रियेतून सोयगाव आणि जरंडीला वगळण्यात आले आहे.
जरंडीला मंडळ स्तरीय तलाठी सज्जा आहे मात्र शुक्रवारी ही तलाठी मात्र दिवसभर कुलूपबंद अवस्थेत होती,त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली होती.