Type Here to Get Search Results !

जरंडीत माकडांचा उच्छाद.जरंडीत शाळकरी विद्यार्थिनी वर जोरदार हल्ला.एक गंभीर.




जरंडीत माकडांचा उच्छाद.जरंडीत शाळकरी विद्यार्थिनी वर जोरदार हल्ला.एक गंभीर.



प्रतिनिधी - बाळू शिंदे

जरंडीत पिसाळलेल्या माकडाच्या हल्ल्यातील गंभीर शाळकरी विद्यार्थिनी, दुसऱ्या छायाचित्रात गावभर माकडांचा उच्छाद.

सोयगाव, दि..२३. घरातून शाळेकडे जाणाऱ्या चार शाळकरी विद्यार्थिनींवर पिसाळलेल्या माकडाने हल्ला चढवून एका सहा वर्षीय बलिकेला गंभीर जखमी केल्याची घटना जरंडी ता सोयगाव येथे शुक्रवारी पहाटे दहा वाजेच्या सुमारास घडली.या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरली होती.
सोयगाव तालुक्यात ग्रामीण भागात मोकाट व पिसाळलेल्या माकडांनी गावात मोठा उच्छाद सूरु केला आहे.शुक्रवारी जरंडीत प्रमुख रस्त्यावर माकडे दबा धरून हल्ले चढवीत आहे तर घराघरावर उड्या ।मारून ग्रामस्थाना त्रास देत आहे घराच्या गच्चीवर माकडांची टोळीच वास्तव्यास आहे त्यामुळे जरंडीत माकडांनी उच्छाद मांडला आहे...जरंडी गावातही शुक्रवारी पहाटे पासून एका पिसाळलेल्या माकडाने मर्कट लीला करून गावभर ग्रामस्थांना जेरीस आणले होते जरंडी गावात विविध भागात या पिसाळलेल्या माकडाने मर्कट लीला करून शाळेत जाणाऱ्या चार विद्यार्थिनी वर हल्ला चढवून त्याचे तावडीत सापडलेल्या पूजा योगेश चव्हाण(वय ६) हिला शाळे समोरच हल्ला चढवून गंभीर जखमी केले असून तिच्या तोंडावर व मानेवर मोठे लचके तोडून त्या बलिकेला अत्यवस्थ केले आहे दरम्यान पूजा चव्हाण हिचे वर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे..त्यातील तीन विद्यर्थिनी माकडाच्या तावडीतून सुटल्या परंतु पूजा चव्हाण हिला माकडाने गंभीर केले आहे..या घटनेमुळे शालेय परिसरात दहशत पसरली होती.

वनविभागाच्या पंचनामा

दरम्यान पिसाळलेल्या माकडाने शालेय विदयार्थीनीला गँभिर जखमी केल्या ची घटना कळताच वनरक्षक सुनील हिरेकर यांच्या सह वनविभागाच्या पथक दाखल झाले होते.

गावात व बस स्थानक परिसरात या पिसाळलेल्या माकडाने वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करून मोठे नुकसान केले या माकडाच्या धुडगूस मुळे पहाटे गावात शांतता पसरली होती दरम्यान या पिसाळलेल्या माकडांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वनविभाग हात हलवीत दाखल

जरंडी गावात पिसाळलेल्या माकडाने मोठा धुडगूस घातला असतांना मात्र या माकडाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा आणण्याऐवजी केवळ लाठ्या काठया घेऊन वनविभाग चे पथक जरंडीत दाखल झाले होते त्यामुळे या माकडाला पिंजराअभावी जेरबंद न करताच पथक सोयगावला निघून गेले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad