Type Here to Get Search Results !

नवरात्र उत्सवात महिलांनी पुढाकार घेऊन सन उत्सव साजरे करा :- अर्चना पाटील




नवरात्र उत्सवात महिलांनी पुढाकार घेऊन सन उत्सव साजरे करा :- अर्चना पाटील






हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे /-शहरातील पोलीस स्थानकात दिनांक 23 सप्टेंबर रोजी भोकर उपविभागीय पोलिस अधिकारी अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आगामी नवरात्र उत्सव काळाच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरासह तालुक्यातील दुर्गा मंडळाच्या व महिलां मंडळाची एक बैठक बोलावण्यात आली होती त्या बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस उपविभागीय अधिकारी अर्चना पाटील यांनी असे सांगितले की नवरात्र उत्सव काळात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन सन उत्सव शांततेत साजरे करा कुठल्याही प्रकारचे डी.जे. किंवा साऊंड सिस्टिम लावू नये जास्तीत जास्त महिलांनी मिरवणुकीत पुढाकार घेऊन मिरवणूक शतातेत व 10 च्या अगोदर विसर्जन करावे कारण अशाने कुठेही गैरप्रकार होणार नाही व गैर प्रकाराला आळा बसेल व गावची शांतता कायम राहील यासाठी सर्वांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून आगामी काळात सण उत्सव साजरे करा असे आव्हान त्यांनी यावेळी केले




यावेळी हिमायतनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनूर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन साहेब,नंदलाल चौधरी,सह नगर पंचायतचे महाजन साहेब,माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड,काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, समद खान ,बजरंग दल तालुका संयोजक गजानन चायल सह शहरातील व तालुक्यातील अनेक दुर्गा मंडळाच्या महिला व पोलीस पाटील संघटनेच्या महिला सरपंच व गावकरी व प्रतिष्ठित नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad