Type Here to Get Search Results !

जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू.फर्दापुर येथील घटना.




जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू.फर्दापुर येथील घटना.

मृत तरुण आशिष जाधव

सोयगाव, दि.२३.. जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या एकाचा तलावात बुडून मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजता फर्दापूर शिवारातील धुंदर तलावात घडली आहे. आशिष संतोष जाधव वय १७ असे बुडून मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.फर्दापूर येथील आशिष संतोष जाधव हा जनावरांना चारण्यासाठी धुंदर शिवारातील पाझर तलाव परिसरात गेला होता दुपारी चार वाजेच्या सुमारास आशिष जनावरांना पाणी पाजण्यासाठी तलावा कडे गेला यावेळी जनावरांनी ओढतांन केल्याने आशिष तलावाच्या पाण्यात पडला व बुडू लागला ही घटना त्याच्या मित्रांनी बघितली व आशिष ला वाचवण्यासाठी आरडाओरडा केला मात्र मदत मिळे पर्यंत आशिषचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाझर तलावा कडे धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने आशिषचा मृत देह तलावा बाहेर काढून शवविच्छेदना साठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला या घटनेची फर्दापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

या घटनेची सोयगाव तहसिल कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तातडीने तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला आहे..

या घटनेमुळे फर्दापुर गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..त्याच्या पश्चात आई,वडील,आणि एक भाऊ असा परिवार आहे.रात्री उशिरा त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad