Type Here to Get Search Results !

कुरुंदयात एक दिवसीय उद्योगजकता परिचय शिबीर संपन्न.




कुरुंदयात एक दिवसीय उद्योगजकता परिचय शिबीर संपन्न.

कुरुंदा: वसमत तालुक्यातील कुरुंदा मधील श्री.दुर्गामाता सांस्कृतिक सभागृहात आदिवासी समाजातील युवक युवतींनी उद्योग क्षेत्रात प्रगती करावी याहेतून जिल्हा उद्योग केंद्र आणि एम सी इ डी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून औरंगाबाद याठिकाणी होणाऱ्या 18 दिवशीय निवासी प्रशिक्षण शिबिराच्या परिचयाचा कार्यक्रम काल दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी संपन्न झाला. या परिचय शिबिराला उद्योग निरीक्षक माननीय बोरकर मॅडम,नांदेड, हिंगोली एम सी इ डी प्रकल्प अधिकारी माननीय शंकर पवार साहेब,दीपक गायकवाड साहेब,कार्यक्रम समन्वयक सिद्धार्थ थोरात साहेब, राहुल कांबळे साहेब, ग्रामविकास अधिकारी आश्रोबा पवार साहेब,गावचे उपसरपंच वामनराव दळवी, डॉ.प्रभाकर दळवी,गुरुप्रसाद स्वामी,कुरुंदवाडी गावचे सरपंच सतीश फोले,सामाजिक कार्यकर्ते रामदास खंडागळे आदी.मान्यवर मंडळी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,प्रकल्प अधिकारी पवार साहेब यांनी उपस्थित युवकांच्या मुलाखती घेतल्या असता वसमत तालुक्यातील चाळीस युवक प्रशिक्षण शिबिरास पात्र झाले असून दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता उद्योग भवन, नांदेड याठिकानाहून सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी औरंगाबाद याठिकाणी रवाना होणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक सिद्धार्थ थोरात यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies