Type Here to Get Search Results !

संभाजी ब्रिगेडचे FRP संदर्भात टोकाई साखर कारखान्यावर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत डफडे बजाव आंदोलनाल संपन्न




संभाजी ब्रिगेडचे FRP संदर्भात टोकाई साखर कारखान्यावर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत डफडे बजाव आंदोलनाल संपन्न




कुरूंदा,
       आज दि. 24 सप्टेंबर रोजी टोकाई स. सा. कारखान्याने FRP न दिल्यामुळेच डफडे बजाव आंदोलन हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न कारखाना प्रशासन अनउत्तरीत..!
टोकाई स.सा.कारखान्याने F.R.P. नदिल्यामुळेच संभाजी ब्रिगेड, हिंगोली च्या वतिने डफडे बजाव आंदोलन झाले यावेळेस मोठ्याप्रमाणात शेतकरी उपस्थित होते. मागील महिन्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि. २५/०८/२०१२२ रोजी कारखाण्यास निवेदन देऊन विनंती करण्यात आली होती की, यावर्षी अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे शेतीसह जनावरे, घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 




त्यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आहे. शेतकऱ्यांना शासनाची तात्काळ मदत अजूनपर्यंत मिळालेली नाही. अशा स्थिती शेतकऱ्यांपुढे शेती व घरखर्चाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे कारखान्याकडे शेतकऱ्याची F.R.P. ची रक्कम शिल्लक आहे. ती रक्कम जर तात्काळ मिळाली तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार मिळेल. त्यामुळे कारखाण्याने शेतकऱ्याचा F.R.P. द्यावा. अशी विनंती करण्यात झाली होती. परंतू शेतकरी अत्यंत अडचणीत असतांना सुद्धा कारखाना प्रशासनाकडून शेतकऱ्याचे हक्काचे/ घामाचे पैसे देण्याऐवजी भावनिक भीती दाखवून बेळ मारुण नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. 




मागील सात वर्षापासुन कारखाण्याकडून शेतकऱ्यांना भावनिक करुन त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेण्याचा प्रकार सुरु आहे. मागील सात वर्षात एकाही शेतकऱ्यांना कारखाना प्रशासनाकडे कुठलीही तक्रार केली नाही. वेळोवेळी प्रत्येक अडचणीत कारखान्याला सहकार्य केले आहे. आणि आज शेतकरी प्रचंड अडचणीत असताना एखादे वेळेस तरी कारखाण्याने शेतकऱ्यांची अडचण समजून घेऊन त्यांना त्यांच्या घामाचे पैसे तात्काळ द्यावे अशी भावना सर्व उस उत्पादक, सभासदांची आहे परंतू कारखाण्याकडून मात्र नेहमीप्रमाणे आताही अडचणीच्या काळात भावनिक अन वेगवेगळ्या भूलथापा देऊन, कारखाना बंद पडण्याची भिती दाखवून गंडवण्याचा प्रयत्न केला जातोय.




शेतकऱ्यांच्या विषयी सतत अन्यायकारक भूमिका घेत बेळेवर F. R.P. देण्यास कारखाना टाळाटाळ करत असल्यामुळे संभाजी ब्रिगेड हिंगोलीच्या वतीने दि २५/८/२०२२ रोजी कारखाण्यास निवेदन देऊन १६ सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना F. R. P. दयावा म्हणुन विनंती केली होती परंतू त्यावर कारखान्या कडून सकारात्मक भूमिका घेण्यात आली नाही. उलट F.R.P. च्या संदर्भात कोणत्याही शेतकन्यांची नाराजी नाही व कारखाना सुरळीत चालू नये म्हणून काही लोक षडयंत्र करत आहेत अशी अफवा निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा संबंधित कडून करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कारखाना प्रशासनाबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सर्व ऊस उत्पादकांना त्यांच्या घामाचे दाम वेळेत मिळावे व त्यांची अडचण दूर करण्यात यावी. यासाठी संभाजी ब्रिगेड हिंगोलीच्या वतीने डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले. व निवेदन कारखाना प्रशासनाकडे देण्यात आले. येत्या 15 दिवसात जर शेतकऱ्यांचे पैसे वेळेत मिळाले नाही तर यापुढील अंदोलन हे पुणे येथील साखर आयुक्तलाया पुढे होईल आसा ईशारा सुद्धा देण्यात आला. होणाऱ्या परिणामास सर्वस्वी जबाबादार कारखाना प्रशासन असेल. आसा इशारा देण्यात आला. या वेळेस संभाजी_ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सतिश पाटील महागावकर, सुरेश इंगोले जिल्हा उपाध्यक्ष संभाजी_ब्रिगेड हिंगोली, अलोक इंगोले विधानसभा अध्यक्ष संभाजी_ब्रिगेड वसमत, विजय डाढाळे, ज्ञानेश्वर माखणे तालुकाध्यक्ष, नारायण खराटे जिल्हा सचिव, नितीन भोसले, कृष्णा बागल, महेंद्र पवार, राम पुंड, विकास भोसले, अंकुश भेंडेगावकर, माधव व्यवहारे,अंगद व्यवहारे,केशव सोनटक्के,प्रसाद व्यवहारे, आदिनाथ भोसले, शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते सुभाषराव पुंड, बालाजी पांडव, विश्वनाथ पांडव, विलास पांडव, नामदेव कदम, मुंजाजीराव इंगोले, दत्तरामजी पाटील इंगोले,
डॉ. प्रभाकर दळवी, कदम सर
पांडूरंग शातलवार, बाळासाहेब इंगोले , गंगाधर महाराज कुरुंदकर, ओमकार शिंदे, तोलाजी नरवाडे आदी शेतकरी सभासद, माय माऊली व पदाधिकारी उपस्थित होते. कुरुंदा पोलीस स्टेशनचे गजानन मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चौक बंदोबस्त लावण्यात आला होता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies