अर्धापूर तालुका प्रतिनिधी
दि.२७ सप्टेंबर २०२२ रोजी केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कन्या शाळा अर्धापूर, जि.प.हा. अर्धापूर, प्रा.शा.देळूब, मेंढला, पांगरी, खरब या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
सर्वप्रथम केंद्राचे केंद्रप्रमुख श्री विकास चव्हाण सरांनी फित कापून उपक्रमाचे उदघाटन करून प्रत्येक गटाला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर आधारित एक प्रश्न विचारून स्पर्धेची औपचारिक सुरुवात करून दिली. तद्नंतर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नांदेड येथील अधिव्याख्याता आदरणीय *श्री अभय परिहार* सरांनी सर्व गटास एक-एक स्पर्धा प्रश्न विचारून मुलांना बोलते केले. पर्यवेक्षक म्हणून प्रा.शा.पार्डी येथील सहशिक्षिका उषा नळगिरे मॅडम, प्रा.शा.मेंढला येथून श्री सोनटक्के सर, प्रा.शा.कारवाडी येथून संतोष राऊत यांनी धुरा सांभाळून प्रश्नमंजुषा स्पर्धा पूर्णत्वास नेली.
स्पर्धेनंतर लागलीच निकाल जाहीर करून मान्यवर उपस्थितांच्या हस्ते यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री अभय परिहार सरांनी 'समुद्राच्या लाटेचे अविरत चाललेले कार्य व आपली कृती' याचा उत्तम सहसंबंध जोडून सदैव आपला अभ्यास करत राहण्याचा मंत्र विद्यार्थ्यांना पटवून दिला. केंद्रप्रमुख श्री विकास चव्हाण सरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गरज समजावून सांगितली व तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. उषा नळगिरे मॅडमनी आपल्या मनोगतात सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. श्री सोनटक्के सरांनी सर्वांना हसवून उपस्थित विद्यार्थी, व सहभागी शाळेचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष राऊत यांनी केले.
या स्पर्धेत ५ वी ते ७ वी या गटात सर्वप्रथम प्रा.शा.पांगरी येथील कु.अक्षरा सटवाजी कदम, कु.अक्षरा तुकाराम किरकन, कु. अनुष्का किशन जलताडे या विद्यार्थिनींनी यश मिळवले.
द्वितीय प्रा.शा.मेंढला शाळेतील विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
मोठ्या गटात प्रा शा देळूब येथील कु. किर्ती किशन इंगोले, कु.स्नेहल माधव ठोमरे, कु. मयुरी गजानन कदम या विद्यार्थिनींनी यश मिळवली आहे.