कुपटी हे गाव बहुतांश संख्येने आदिवासी लोकसंख्या जास्त प्रमाणात असून या गावात जिल्हा परिषद शाळा पहिली ते पाचवी आहे. त्या शाळेतील विद्यार्थी 58 इतकी आहे.
तर शिक्षक दोन आहेत पहिली ते पाचवी वर्ग असून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी एकच वर्ग असून विद्यार्थी त्या वर्गात दाटनीत बसत आहेत.
दुसरी एकही खोली उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना अडचण होत आहे
गावकरी व पालक प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनही बांधकाम करत नाहीत. सर्व पालक व नागरीक नाराज असून दिनांक 22 /8/ 2022 रोजी ग्रामपंचायत या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात आले होते त्यावेळी सरपंच व ग्रामसेवक यांनी लेखी स्वरूपात वर्ग खोली उपलब्ध करून देतो असे आश्वासन देण्यात आले होते.
त्यामुळे पालक संतप्त असून शाळेला कुलूप लावण्यात आले आहे.यावेळी उपस्थित शालेय व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष गणपत डुकरे, उपाध्यक्ष दत्ता बोडके गावचे पोलीस पाटील गंगाधर पंगणवाड, उपसरपंच माधव डुडुळे,कोंडबा खोकले, माधव वानोळे, विनोद डुडुळे, शिवाजी खोकले, नागनाथ संकेपलू व पालक यावेळेस उपस्थित होते
91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव ईस्लापुर