Type Here to Get Search Results !

भरधाव‌ अवजड ‌ कंटेनरची‌ बैलगाडीला‌ धडक‌ ,एक‌ शाळकरी‌ मुलाचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी




भरधाव‌ अवजड ‌ कंटेनरची‌ बैलगाडीला‌ धडक‌ ,एक‌ शाळकरी‌ मुलाचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, एक बैल ठार तर‌ दूसरा‌ बैल‌ व‌ म्हैस‌ गंभीर जखमी,


कंधार/लोहा प्रतिनिधी 

कंधार तालुक्यातील शिराढोण येथून जवळच असलेले गोळेगाव येथे

 भरधाव‌ कंटेनरने‌ शेतातून गावाकडे जाणाऱ्या बैलगाडीला‌ जबर धडक दिली या अपघातात एका शाळकरी मुलाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर‌ आणि दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, दरम्यान अपघातग्रस्त कंटेनर घटनास्थळी पलटी झाला व‌ चालक पण जखमी झाला आहे आणि एक बैल ठार तर दुसरा बैल‌ व‌ दुभती‌म्हैस‌ गंभीर जखमी झाली आहे.

या‌ जनावरांवर‌ पशु चिकित्सकांकडून‌ उपचार करण्यात येत आहे, ही‌ घटना कापसी मारतळा मार्गावर गोळेगाव ता‌. लोहा शिवारात दि‌. 27 सप्टेंबर रोज‌ मंगळवारी रात्री 7,30 वाजता घडली, उस्माननगर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की गोळेगाव ता‌. लोहा येथील शेतकरी मच्छिंद्र शावूराज‌ ढाले वय‌ ४० वर्ष हे दि‌. 27 सप्टेंबर रोज मंगळवारी नेहमीप्रमाणे बैलगाडी जूंपून‌ त्यावर औत‌ खत‌ घेऊन शेतातील खरिपाची अंतर मशागतीची काम करण्यासाठी गेले या दिवशी दिवसभर काम करून रात्री उशिरा बैल वगैरे चारून ७,30 वाजता याच आपल्या बैलगाडीवर जनावरांचा चारा घेऊन गावाकडे निघाले तेंव्हा ‌ या‌ बैलगाडीवर‌ त्यांच्याच घरातील दोन शाळकरी मुले पण शेतात शाळेला सुट्टी झाल्यानंतर आई-वडिलांना मदत करावी म्हणून आले होते ते पण गाडीवर बसले तेवढ्यात गाडी गोळेगावकडे जात असताना शिराढोण कडून मारतळ्याकडे‌ भरधाव ‌ वेगाने येणारा कंटेनर क्रमांक एम‌ एच‌ २६/बी.४०८० यांनी या बैलगाडीला‌ समोरासमोर जबर धडक दिली या भीषण अपघातात गाडीवर‌ बसलेला‌ राजेश रघुनाथ ढाले वय‌ १६ वर्ष, मच्छिंद्र शाहूराज ढाले वय‌ ४० वर्ष, व गजानन मच्छिंद्र ढाले वय १५ वर्ष हे तिघेही गंभीर जखमी झाले त्यातच‌ राजेश याच्या‌ डोक्यात गंभीर दुखापत झाली होती त्यामुळे त्याची प्रकृती क्रिटिकल असल्याने त्याच्यावर नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र दुर्दैवाने त्याचा दि. २८ सप्टेंबर रोज बुधवारी दुर्दैवी मृत्यू झाला व अन्य दोघांवर याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत, या भीषण अपघातात बैलगाडीचा‌ सारथी सर्जा राजा त्यातील एक‌ बैल जागीच ठार तर‌ दुसरा बैल व म्हैस‌ गंभीर जखमी असून या दोन जनावरांवर पशु वैद्यकीय दवाखान्याचे डॉ ‌. एस बी कोकरे हे उपचार करीत आहेत, मयत‌ राजेश याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, राजेश रघुनाथ ढाले हा‌ शिराढोण येथील भीमाशंकर विद्यालयात इयत्ता ‌ दहावीत‌ शिक्षण घेत होता शाळा संपल्यानंतर तो आई-वडिलांना शेतीकामात मदत करण्यासाठी अगदी दररोज दोन तास आपल्या शेतात काम करण्यासाठी हजर असायचा असाच तो मंगळवारी काम करण्यासाठी शेतात आला व काम करून आपल्या सर्जा राजाच्या बैलगाडीवरून गावाकडे जाताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला व शेतातले हे काम त्याचे अखेरचे ठरले त्याचे ह्या अपघाती मृत्यूने‌ गोळेगाव येथील ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे, त्याच्या‌ पार्थिवावर येथील स्मशानभूमी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात आई वडील दोन बहिणी असा परिवार असून‌ तो‌ आई वडीलास एकुलता एक असा पुत्र होता या अपघाताने त्यालाही हिरावल्याने मयत राजेश ढाले यांच्या आई खाट धरून पकडली आहे, याप्रकरणी उस्मान नगर पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती कंटेनर चालक हा दारूच्या नशेत‌ असल्याने ‌ अपघात घडल्याचे तेथे जमलेल्या नागरीकाडून सांगण्यात येते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News