कंधार/लोहा प्रतिनीधी विठ्ठल कतरे पांगरेकर
गेल्या काही दिवसापुर्वी शेतामध्ये काम करत असलेल्या कंधार तालुक्यातील रमणेवाडी येथील पांडुरंग गोविंद कंधारे व नागदरवाडी येथील संगाबाई तातेराव केंद्रे यांचा वीज पडून अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला होता, लोहा , कंधार मतदार संघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी केंद्रे व कंधारे कुटुंबीयांना शासकीय आर्थिक मदत तात्काळ मिळवून देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला होता, काल बुधवारी लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी वीज पडून मृत्यू पावलेल्या नागदरवाडी व रमणेवाडी येथील संगाबाई तातेराव केंद्रे व पांडुरंग गोविंद कंधारे यांच्या स्वतः घरी जाऊन प्रत्येकी चार लक्ष रुपये असा कंधारे व केंद्र कुटुंबीयांना एकूण आठ लक्ष रुपयाच्या धनादेशाचे वाटप दोन्ही कुटुंबातील मयतांच्यावारसांना आमदार शिंदे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले, यावेळी लोहाचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, खरेदी-विक्री संघाचे उपसभापती शाम अण्णा पवार, केशवराव तिडके, हाडोळीचे सरपंच लक्ष्मण केंद्रे, माळाकोळी चे उपसरपंच निखिल मस्के ,बाबुराव केंद्रे, गुणाजी गुरुजी, चेअरमन नागेश खांबेगावकर, संचालक सुधाकर सातपुते, सिद्धेश्वर वडजे, राहुल पाटील बोरगावकर, धोंडीबा बोईनवाड,मनोज भालेराव, प्रसाद जाधव, तलाठी, मंडळ अधिकारी ,सह कार्यकर्ते, पदाधिकारी ,गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.