Type Here to Get Search Results !

स्व.माणिक पोदार लर्न स्कूल, वाढोणा येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा.




स्व.माणिक पोदार लर्न स्कूल, वाढोणा येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

स्व. माणिक पोदार लर्न स्कूल, वाढोणा येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शिक्षक दिन हा शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. शिक्षकांच्या समाजातील योगदानाची आठवण ठेवून शिक्षकांचा सन्मान करण्याचा दिवस.भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर हा १९६२ पासून देशात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. हिंदू धर्मानुसार गुरुपौर्णिमा हा तिथीनुसार साजरा करायचा दिवस. गुरुपौर्णिमेला गुरुजनवर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी प्रामुख्याने अध्यात्मिक गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. अनेकजण शिक्षक दिन आणि गुरुपौर्णिमा हे दोन्ही दिवस उत्साहाने साजरे करतात.आईवडिलांनंतर शिक्षक हेच पहिले गुरू असतात, जे आपल्याला योग्य-अयोग्य यातला फरक समजावून देतात, आपल्याला अक्षरे गिरवायला शिकवतात, आपल्या हिताचा विचार करतात, आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतात. असे म्हणतात की आपली शाळा, महाविद्यालय हे आपले दुसरे घर असते, कारण घराखालोखाल सगळ्यात जास्त वेळ आपण शाळेत घालवतो आणि यावेळी आपल्या शिक्षकगणांच्या सान्निध्यात असतो. त्यामुळे असे म्हणता येईल की आपले शिक्षक हेही आपल्या मोठ्या कुटुंबाचा एक भाग असतात आणि कुटुंबातल्या सदस्यांप्रमाणेच ते आपल्या आयुष्याला पैलू पाडतात. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्यविभागप्रमुख अमोल शुक्ला व प्राचार्य बस्वराज जगाये तर प्रमुख पाहणे म्हणून पोदार जम्बो किड्स च्या मुख्याध्यापिका नर्गिस अंजुम व पवन जाधव उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलंन व हारार्पण करण्यात आले. तसेच शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. तसेच वर्ग 10 वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांची वेशभूषा साकारून शिक्षक दिन साजरा केला.
यासोबतच शाळेचे मुख्य विभागप्रमुख, प्राचार्य यांची समायोचित भाषणे संपन्न झालेत. शिक्षक दिना निमित्त सानिका पवार सह अध्यक्ष,शुभम खोडके मुख्य विभागप्रमुख व हर्षदा भिसे प्राचार्य यांनी काम पाहले. कार्यक्रमाची प्रस्तावना स्नेहा जमधाडे व कार्तिक जेथलिया यांनी केली.
कार्यक्रमाचे वार्ताकन अभयकुमार औंढेकर यांनी केले.
प्रतिनिधी : रवि गवळी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News