नांदेड प्रतिनिधी जांबुवंत मिराशे/
जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जनावरांना लंपि स्किन डिसिज या रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही. तसेच नांदेड तालुक्यात लपि स्किन डिसिज या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पूर्वकाळजी प्रत्येक गावातून प्रत्येक शेतकर्यांना गावोगावी जाऊन पशुवैद्यकांची टीम मार्गदर्शन करत आहेत.
सदर रोगाचा प्रसार डास, चावणाऱ्या माशा ,गोचिड गोमाशी , दूषित चारा पाणी व बाधित जनावरांचा स्पर्श यामुळे या रोगाचा प्रसार होतो .या रोगाचा संसर्ग कॅप्री पोक्स विषाणूमुळे होतो.शेळ्या व मेंढय़ा तील विषाणूमधील देवी रोगांच्या विषाणूंचे संबंधित आहे .
रोगाची लक्षणे
जनावरांच्या अंगावर दहा ते वीस मिमी व्यासाच्या गाठी येतात ,सुरवातीस भरपूर ताप येतो ,डोळ्यांतून व नाकातून चिकट स्राव जात,चारा पाणी खाणे कमी अथवा बंद होते, दूध उत्पादनात कमी होते, काही जनावरांच्या पायावर सूज येते व लगडतात.
पशुपालकांनी घ्यावयाची काळजी
बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे ,कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेश बंदी करावे ,रोग प्रादुर्भाव झालेल्या गावांतील बाधित व निरोगी जनावरांना चराऊ कुरणामध्ये एकत्रित सोडण्यास बंदी करावे ,डास गोचीड व तत्सम किड्यांचा बंदोबस्त करावा तसेच निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषध लावावे व गोठ्यामध्ये यासाठी औषधींचा फवारणी करावी,रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रदुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच स्थानिक बाजारामध्ये नेण्यास प्रतिबंध करावे.
जनावरांना काही लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची संपर्क साधून उपचार करून घ्यावेत असे आवाहन डॉ अविनाश बुन्नावार पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती नांदेड यांनी केलेले आहे.