Type Here to Get Search Results !

गंगाखेड | व्यसन सोडणे ही ईश्वर भक्तीच- ह भ प रोहिदास महाराज मस्के




व्यसन सोडणे ही ईश्वर भक्तीच- ह भ प रोहिदास महाराज मस्के




गंगाखेड प्रतिनिधी
व्यसन सोडणे ही एक ईश्वर भक्तीच आहे .मंडळाच्या युवकांनी व्यसन सोडून इतरांना आदर्श घालून द्यावा असं आवाहन रामायणाचार्य ह भ प रोहिदास महाराज मस्के यांनी पडेगाव येथे युवा मल्हार गणेश मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कीर्तन समारंभात बुधवारी केलं.




पडेगाव येथील खंडोबा मंदिर संस्थांन च्या आवारात बुधवारी ह भ प रामायणाचार्य रोहिदास महाराज मस्के यांची सकाळी आठ ते दहा या वेळात कीर्तन सेवा संपन्न झाली. युवा मल्हार गणेश मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. महाराजांचे स्वागत वरपूडकर शिक्षण संस्थेचे सचिव नागनाथराव निरस व आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केलं .यावेळी सोसायटीचे चेअरमन मारोतराव निरस, वागलगावचे माजी सरपंच नारायणराव घनवटे, गुंजेगावचे माजी सरपंच विक्रम बाबा इमडे ,हभप बाळू महाराज बहादुरे, श्रेयस महाराज मुलगीर ,विकास मस्के महाराज, ह भ प बापूराव महाराज पडेगावकर, तुळशीदास काका निरस, मृदंगाचार्य ओंकार महाराज बोबडे, जनार्दन महाराज भूमरे आदीसह परिसरातील ग्रामस्थ, भजनी मंडळ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा आनंद उपस्थित भाविक भक्तांनी घेतला. महाराजांचे यजमानपद स्वीकारल्याबद्दल मंडळ अधिकारी यशवंत सोडगीर यांचे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा मल्हार गणेश मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News