माकडाच्या हल्ल्यात गंभीर झालेला मनोज पवार
सोयगाव, दि..२५..शेतातून घराकडे जात असतांना झाडावर दबा धरून बसलेल्या माकडाने २६ वर्षीय शेतकऱ्याच्या मोटारसायकल वर झडप घेऊन त्यास गंभीर केल्याची खळबळजनक घटना पुन्हा निंबायती शिवारात रविवारी घडली आहे. या घटनेत शेतकरी मनोज सरीचंद पवार(वय २६)गंभीर जखमी झाला आहे. त्यास तातडीने उपचारासाठी पाचोरा जि. जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
जरंडी गावात एका पिसाळलेल्या माकडांची चार शालेय विद्यार्थिनींवर हल्ला चढविल्याची घटना ताजी असतांना पुन्हा निंबायती शिवारात एका शेतकऱ्यांवर माकडाने चक्क झाडावर लपून बसला असता,मोटारसायकल जवळ येताच हल्ला चढविला आहे.या घटनेमुळे जरंडी पाठोपाठ आता निंबायती गावातही दहशत पसरली असून,सोयगाव वनविभाग अद्यापही या माकडाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेत नाही,त्यामुळे ग्रामस्थांची भीती वाढली आहे...जरंडी ला शालेय विद्यार्थिनींवर माकडाच्या हल्ल्या प्रकरणी वन विभागाने शनिवारी माकडाला जेरबंद करण्यासाठी हुडकले मात्र शनिवारी पहाटे गावात असलेल्या त्या माकडाने वनविभागाच्या पथकाला पुन्हा गुंगारा देऊन वनविभागाच्या हातावर तुरी दिल्या आहे..त्यामुळे जरंडीतील ते पिसाळलेले माकड अद्यापही मोकाटच असतांना पुन्हा निबायती शिवारात ही घटना घडली आहे.
शुक्रवारी जरंडीत पिसाळलेल्या माकडाने चार विद्यार्थिनींवर हल्ला चढवून गंभीर केल्या नंतर वनविभागाने शनिवारी या परिसरात शोध मोहीम घेतली, परंतु त्या माकडाने वनविभागाने जाळ्यात घेण्यासाठी आखलेले सर्वच प्रयोग हाणून पाडले होते, त्यानंतर मात्र पुन्हा निंबायती शिवारातील एका शेतकऱ्यांवर हल्ला झाल्यावर हे माकड कोणते असा प्रश्न वनविभागालाही पडला आहे...
निंबायती शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्यात त्या शेतकऱ्याचे नाकाचे हाड मोडले आहे... त्यामुळे नाकाच्या शस्र क्रियेला मोठा खर्च वैद्यकीय सूत्रांनी सांगितला आहे...