सोयगाव, दि.२५...एक नव्हे!दोन नव्हे! तब्बल अकरा शेतकऱ्यांचे वीजपंप आणि इतर शेती उपयुक्त साहित्य चोरी गेल्याचा खळबळजनक प्रकार शनिवारी रात्री एका शेतकऱ्याच्या वीज पंप चोरी झाल्यावर निंबायती शिवारात उघडकीस आला असून याप्रकरणी अकरा शेतकऱ्यांनी सामूहिक तक्रार सोयगाव पोलीस ठाण्यात दिली आहे..
निंबायती शिवारात शेतकरी गजानन प्रल्हाद राठोड यांच्या गट क्र-७६ मध्ये शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी विहिरीतील वीज पंप काढून चोरी केल्याचा प्रकार रविवारी पहाटे उघडकीस येताच यापूर्वीही महिनाभरात तब्बल दहा शेतकऱ्यांचे वीज पंप,केबल, व स्टार्टर आदी वस्तू चोरी झाल्याचा प्रकार शेतकऱ्यांनी रविवारी कथन केल्या वरून निंबायती शिवारात महिना भरात तब्बल नऊ वीज पंप आणि इतर शेतकऱ्यांचे केबल, स्टार्टर, आदी शेती उपयुक्त साहित्य असे एकूण दोन लक्ष रु चा मुद्देमाल अज्ञातांनी चोरी केला आहे.त्यामुळे निंबायती परिसरात वीजपंप आणि इतर शेती उपयुक्त साहित्य चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याचा त्रासावरून गजानन राठोड यांचे सह अकरा शेतकऱ्यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात सामूहिक तक्रार दिली आहे दरम्यान शेतकरी गजानन राठोड यांच्या या विहिरीतून एक नव्हे तर दोन वेळा वीजपंप चोरी झाली आहे त्यामुळे या शिवारात वीजपंप चोरीचे रॅकेट सक्रिय झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे
-----आठवडाभराच्या कालावधीत कापूस वेचण्या सुरू होणार आहे,पाहिलाच वेचणीत कापसाच्या प्रमाण मोठे असते त्यामुळे मजुरांच्या अभावी शेतकऱ्यांची वेचणी अपूर्ण राहते त्यामुळे कापूस वेचण्याही मोठ्या प्रमाणात होतात असेही या शेतकऱ्यांनी सांगितले आहे...