बहुलखेडा शिवारात कपाशी पिकांचे मोडलेले शेंडे, दुसऱ्या छायाचित्रात नुकसान
सोयगाव, दि.२५..बहुलखेडा ता सोयगाव शिवारात चार दिवसापूर्वी शेतकऱ्यांची एक एकर क्षेत्रातील बहरलेली कपाशी पिके उखडून फेकण्याची घटना ताजी असतांनाच पुन्हा याच शिवारात शनिवारी रात्री अज्ञातांनी बहरलेली कपाशी पिकांची कैऱ्यासह शेंडे कुरतडून टाकल्याची घटना रविवारी उघडकीस आल्याने बहुलखेडा शिवारात शेतकऱ्यांना धडकीच भरली आहे..
मखराम कौरू पवार असे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नाव असून त्यांच्या गट क्र-१४० मध्ये लागवड केलेल्या कपाशी पिकांच्या कैऱ्यांनी बाळसे धरले असताना शनिवारी रात्री अज्ञातांनी या बहरलेली कपाशी पिकांची शेंडे तोडून फेकली आहे त्यामुळे त्यांच्या शेतातील एक एकर क्षेत्रात हा प्रकार समोर आला असून या शिवारातील हा पिकांच्या नुकसानीची मालिका सुरूच असल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे...दरम्यान याबाबत कोणताही उलगडा होत नसल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहे. या आधी २१ सप्टेंबर च्या रात्रीही शेतकरी रमेश वानखेडे यांच्या शेतातील कपाशी पिके उपटवून फेकल्याचा प्रकार समोर आला होता याप्रकरणी रमेश वानखेडे यांनी सोयगाव पोलिसात फिर्याद दिली होती,परंतु अज्ञात आरोपीना शोधून काढणे सोयगाव पोलिसांना एक आवाहन झाले असतांना पुन्हा त्याच शिवारात अज्ञातांनी कपाशी पिकांचे शेंडे कुरतडून नुकसान केले असून या घटनेत मखराम पवार यांची सुमारे आठशे झाडांची नुकसान झाले आहे.
पोलिसांना आव्हान
बहुलखेड्यात कपाशी पिकांच्या नुकसानीची मालिका सुरूच असून, आधीच अतिवृष्टीच्या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना या नवीन संकटाला तोंड द्यावे लागत असून अज्ञातांनी सोयगाव पोलिसांना एक प्रकारे आव्हान उभे केले आहे.