अर्धापूर ता,प्र, :-- पंचायत समिती अर्घापुरच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम व अमृतमहोत्सव वर्ष , राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा दि.१७ सप्टेंबर २०२२ ते २ ऑक्टोंबर २०२२ तसेच माता सुरक्षित तर घर सुरक्षित नवरात्र उत्सव २०२२ व राष्ट्रीय पोषण,जनजागृती अभियान मा.मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर ( घुगे ) मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी तथा प्रशासक मिना जे रावताळे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली दि.२८ सप्टेंबर २०२२ रोजी पंचायत समिती सभागृहात कार्यक्रम घेतण्यात आला.यामध्ये तालुक्यामध्ये ग्रामिण भागातील विविध विभागाच्या तक्रारी याचा निपटारा व केंद्र शासन राज्य शासन यांच्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांना साहित्य व प्रमाणपत्र चाटप करून करण्यात आला . यावेळी तालुकास्तरिय अधिकारी मुरलीधर राजे ( कृषी अधिकारी ) , विस्तार अधिकारी व्ही . एम . मुंडकर , एस . पी . गोखले , एन . सी . सुर्यभान , डि . व्ही . मोरलवार , जामुदे कक्ष अधिकारी आर . टी . सातव , शाखा अभियंता मोहम्मद सुलेमान व कादर शेख ए . पी . ओ . साधना कांबळे उपस्थित होती . या कार्यक्रमामध्ये तालुक्यामधील विविध विभागाच्या वतीने लाभाथ्र्यांना प्रमाणपत्र व साहित्य वाटप करण्यात आले . पंचायत समिती अर्धापुर च्या वतीने दिव्यांगाना ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व साहित्य वाटप करण्यात आले . आरोग्य विभागाच्या वतीने गरोदर मातांना जननी सुरक्षा कार्ड व आभा कार्ड वाटप करण्यात आले तसेच कुष्ठरुग्णांसाठी साहित्य गटविकास अधिकारी मिना रावताळे यांच्या हस्ते देण्यात आले . एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या वतीने गरोदर मातांना बेबी केअर किट वाटप करण्यात आले . कृषी विभागाव्या वतीने डॉ . बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन २०२१-२२ नविन विहीर खोदकामासाठी संमती पत्र वाटप करण्यात आले व तसेच सन २०२०-२१ मधील विहिर पुर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना विहिर पुर्नत्वाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले . बांधकाम विभागाच्या वतीने प्रधानमंत्री घरकुल आवास योजना व रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम सुरू करण्यासाठी घरकुल पुर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना आदेश व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले . नरेगा विभागाच्या वतीने वैयक्तिक जनावरांचा गोठा कार्यरंभ आदेश देण्यात आले . यावेळी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी बीएनओ श्रीमती येमेवार , उमाकांत पिंपले , कुष्ठरोग तंत्रज्ञ श्री . साखरे व सोनवणे,अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती हंगे व कांबळे, पंचायत विभागाचे कांटकळंबे , आकुलवार , माटे एन . एन . श्रीमती बुडकेवार व रजित गजभारे आदीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले . या कार्यक्रमाला बहुसंख्यने तालुक्यामधील लाभार्थी उपस्थित होते.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा निमित्य पंचायत समिती अर्धापुरच्या वतीने लाभार्थ्यांना साहित्य व प्रमाणपत्र वाटप
बुधवार, सप्टेंबर २८, २०२२
0