अर्धापूर ता,प्र, :-- ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाचे कार्यक्रम प्रभावीपणे राबिविण्यात अग्रेसर असलेले ग्रामीण रुग्णालयात दि.२७ सप्टेंबर २२ रोजी माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान दिनांक २६ सप्टेंबर २०२२ ते ५ आक्टोबर पर्यंत नवरात्रोत्सव करण्यात येत आहे.या शुभ मुहूर्तावर ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांच्या हस्ते मोहिमेचे फित कापून उदघाटन करण्यात आले कानोडे यांनी महिलांना असणाऱ्या आजार विषयी माहिती दिली त्यांना शक्यतो फळे व पाले भाज्या नियमितपणे आहारात समावेश असावा त्यामुळे महिला स्ट्राँग राहतील असे मनोगत व्यक्त केले.माता सुरक्षित तर घर सुरक्षितया अभियान विषयी वैद्यकीय अधिकारी डॉ.पाटील यांनी महिलांना आरोग्य बद्दल माहिती सांगुण मार्गदर्शन केले व सर्व जनतेनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा महिलांनी आरोग्य तपासण्या करून घेण्याचे असे आवाहन केले.ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.यावेळी नगरसेवक सोनाजी सरोदे,नगरसेवक व्यंकटी राऊत,डॉक्टर,सर्व नर्स, कर्मचारी व पेशंट यांची उपस्थिती होती.