महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन व नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 14 वर्षाआतिल राज्य स्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा नाशिक येथिल विभागीय क्रिडा संकुलन येथे उत्साहात संपन्न झाली.
त्यामध्ये प्रथंम क्रमाक अहमदनगर ,दूसरा क्रमाक ठाणे
तिसरा क्रमाक औरागाबाद चौथा क्रमाक ऊस्मानाबाद मूली संघामध्ये प्रथम क्रमाक भडांरा, दूसरा क्रमाक CBSC नाशिक,
तिसरा क्रमाक नाशिक ग्रामीण या संघांनानी मिळाल्याबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी, टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे , महेश मिश्रा ,विलास गिरी व नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड ,सहसचिव धनंजय लोखडे
इत्यादी उपस्थित होते.राज्य टेनिस क्रिकेट सचिव मिनाक्षी गिरी यांनी खेळाडूंना टेनिस क्रिकेट खेळाची माहिती व नियम सांगितले. तसेच नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी सर्व आलेल्या सचिवांचे व क्रीडा शिक्षक व खेळाडूंचे स्वागत केले.
या स्पर्धेसाठी राज्यातून मुलांचे19 संघ व मुलींचे 8 संघानी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचा अंतिम सामना भंडारा विरुद्ध CBSC नाशिक,जिल्हा यांचा झाला. भंडारा ने चांगला खेळ करत संघाला विजयश्री मिळवला. CBSC नाशिक,संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला.
तसेच नाशिक ग्रामीण संघाला तिसरा क्रमांक मिळाला बद्दल व संघाच्या चांगल्या कामगिरीबद्दल महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी, विलास गिरी ,स्वप्निल ठोंबरे ,महेश मिश्रा, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.तसेच पंच म्हणून धनंजय लोखडे , कुणाल हळदणकर ,धनश्री गिरी, रोशन किडवकर मानस पाटील,सिध्देश गुरव , पंकज सुखे ,सुमित आनेराव ,विजय उंबरे,आफ्रिन पडानिया ,मोहीत फोके.या सर्वांनी पंच म्हणून काम बघितले.