सावळदबारा मंडळात तहसीलदार रमेश जसवंत, तालुका कृषी अधिकारी संपत वाघ व इतर नुकसान पाहणी करतांना,दुसऱ्या छायाचित्रात महसूल व कृषीच्या पथक.
सोयगाव, दि.२२..सोयगाव तालुक्यात रविवारी व सोमवारी झालेल्या चारही मंडळातील अतिवृष्टीच्या पावसाच्या नुकसानीची पंचनामे करण्याचे आदेश गुरुवारी सायंकाळी सीयगाव तहसिल कार्यालयाला धडकताच तहसीलदार रमेश जसवन्त व तालुका कृषी अधिकारी संपत वाघ यांच्या पथकांनी गुरुवारी सायंकाळी सावळदबारा मंडळात खरिपाच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली महसूल आणि कृषी विभागाने सायंकाळच्या अंधारातच पाहणीं करून नुकसानीची वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार रमेश जसवंत यांनी बजवल्या आहे..त्यामुळे आता सोयगाव, जरंडी, बनोटी आणि सवाळदबारा या चारही मंडळात खरिपाच्या नुकसानीची पंचनामे होणार असून या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सोयगाव तालुक्यात रविवारी रात्री आणि सोमवारी अतिवृष्टी चा पाऊस झाला,यामध्ये बनोटी मंडळात ढगफुटीच्या पावसाची नोंद करण्यात आली होती,तर सोयगाव, जरंडी आणि सावळदबारा या तिन्ही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली, परंतु सोयगाव तालुक्यातील पंचनाम्यांच्या बाबतीत तब्बल तीन दिवस मौनव्रत धरलेल्या जिल्हा प्रशासनाने अखेर गुरुवारी सततच्या पावसाच्या आणि अतिवृष्टीच्या नुकसानीत झालेल्या खरिपाच्या पिकांची वस्तूनिष्ठ नुकसानीची पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने तालुका प्रशासन खडबडून जागे होऊन गुरुवारी सायंकाळी तहसीलदार रमेश जसवंत तालुका कृषी अधिकारी संपत वाघ,महसूल आणि कृषि च्या पथकांनी सायंकाळी थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सोयगाव तालुक्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी तहसीलदार रमेश जसवंत यांनी ८४ गावांसाठी गावनिहाय त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे या समितीत ग्रामसेवक, तलाठी, आणि कृषी सहायक यांचा समावेश असून या समितीने वस्तुदर्शक स्थितीचा नुकसानीचे पंचनामे करावे सततचा पाऊस ,अतिवृष्टी आणि पुरात वाहून गेलेल्या पिकांचेच पंचनामे करण्यात यावे असे नमूद करण्यात आले असून या समितीने थेट बांधावर जाऊन छायाचित्रांसह पंचनामे अहवाल सादर करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहे.
सोयगाव तालुक्यातील अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शासन निर्णय १३ मे २०१५ चा निकष लागू करण्यात आलेला असून यामध्ये सततचा पाऊस या निकष खाली खरीप शेती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचेच पंचनामे करावे असे निर्देश देण्यात आले आहे त्यामुळे सततच्या पावसात आणि अतिवृष्टीत ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्राची माहिती संकलित करण्याचे काम महसूल आणि कृषीच्या पथकांनी हातो घेतले आहे...