Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक | मतदान केंद्रांची पाहणी करून तीन दिवसात अहवाल सादर करा, निवडणूक विभागाचे निर्देश.




जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक | मतदान केंद्रांची पाहणी करून तीन दिवसात अहवाल सादर करा, निवडणूक विभागाचे निर्देश.




सोयगाव, दि.२२..निवडणूक विभागाकडून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांची पूर्वतयारी हाती घेण्यात आली असून तालुक्यातील मतदान केंद्रांची तातडीने तपासणी करून तीन दिवसात अहवाल सादर करण्याचा सूचना गुरुवारी निवडणूक विभागाने सोयगाव तहसिल कार्यालय च्या निवडणूक विभागाला दिल्या आहे..त्यामुळे गाव सज्जाचे तलाठी,मंडळ अधिकारी तातडीने या कामांसाठी लागले असल्याने सोयगाव तालुक्यात पुन्हा आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे.

ओ. बी.सी आरक्षणाच्या मुद्द्यांवर रेंगाळत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांना दि.२२ सप्टेंबर० पासुन गती मिळाली असून ओ. बी.सी आरक्षणाचा मुद्द्यांवरून स्थगित करण्यात आलेली गट आणि गण निहाय आरक्षण सोडत आणि अंतिम मतदार यादीला प्रसिद्धी देण्यात येणार आहे त्यामुळे आता पावसाळा संपताच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे फिव्हर शासन पातळीवर सुरू झाल्याने वातावरणात ढवळून निघणार आहे..सोयगाव तालुक्यात आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक गट आणि गण स्थिती जैसे थे आहे त्यामुळे आरक्षण सोडत बदल मध्ये क्वचित बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून एखादी गट अपवाद वगळता इतरत्र आरक्षण सोडत जैसे थे राहण्याची शक्यता आहे.

मागील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठीजाहीर झालेल्या सुधारित मतदार यादी कार्यक्रमातअंतिम मतदार यादी ग्राह्य धरण्याची दिनांक ३१ मे २०२२ होता तर २९ जुलै ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर काढण्यात आलेल्या आरक्षण व सोडतला दि. पाच आगस्टला निवडणूक विभागाने स्थगिती देऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक च्या प्रक्रियेला ब्रेक लावला होता, परंतु पावसाळा संपण्याचे संकेत मिळताच गुरुवारी सोयगाव तालुक्यातील मतदार केंद्रांची पाहणी करून तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश देऊन निवडणूक विभागाकडून आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांची पूर्वतयारी हाती घेण्यात आली आहे.

सोयगाव तालुक्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी ९७ मतदान केंद्रे आहे.

आधार प्रमानिकीकरंन व आधार जोडणीच्या कामांनी सोयगाव तालुक्यात वेग घेतला असून सिल्लोड-सोयगाव मतदार संघातील सोयगाव तालुक्यातील ५७ मतदान केंद्रात ५१ हजार ९० मतदारांपैकी २२हजार ५४४ मतदारांचे आधार जोडणी व प्रमानिकीकरन पूर्ण करण्यात आले असून सोयगाव-कन्नड मतदार संघातील ४० मतदार केंद्रातील ३६ हजार ९५० मतदारांपैकी २२ हजार २०८ मतदारांचे आधार जोडणी व प्रमानिकीकरणं पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार हेमंत तायडे यांनी दिली आहे त्यामुळे सिल्लोड-सोयगाव मतदार संघात ४४.१३ टक्के आणि कन्नड-सोयगाव मतदार संघात ६०.१० टक्के कामगिरी सोयगाव तालुक्याची पूर्ण झाली आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad