लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची सेलू नगरपालिका कडे मागणी
दिनांक 14 सप्टेंबर 2022 रोजी रशियाची राजधानी मॉस्को येथे जगविख्यात म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा उभी करण्यात आली यावेळी रशियामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडवणीस यांच्या हस्ते मॉस्कोतून अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले रशियाने अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा साहित्याचा गौरव केला ही बाब आपल्या भारत देशाला अभिमानाची आहे
याच पार्श्वभूमीवर सेलू शहरांमध्ये ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी नगरपरिषद सेलू कडे मातंग समाज व कॉम्रेड अण्णाभाऊ साठे विचार मंच यांनी केली
प्रमुख मागण्या पुतळ्याच्या मागच्या बाजूला साठेंच्या जीवनातील आत्मचरित्रावर देखावा करण्यात यावा ,परिसरात वृक्ष लागवड करण्यात यावी ,सीसीटीव्ही कॅमेरे बसण्यात यावीत
यावेळी उपस्थित-पप्पू खनपट्टे शाम जोगदंड , सागर गायकवाड ,मुकेश घोडे, पंकज लांडगे ,विशाल गायकवाड ,विकास खंडागळे, रोहित गायकवाड ,संदीप जाधव, लंकेश गायकवाड, दादाराव खरात, विनोद घोडे, राजू घोडे ,श्रीकांत जाधव