Type Here to Get Search Results !

फलटण तालुक्यातील आजी-माजी पदाधिका-यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश




फलटण तालुक्यातील आजी-माजी पदाधिका-यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

बंडखोर आमदारांनी शिवसेनेतुन केलेल्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील जनता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. फलटण तालुक्यातील झिरपवाडी गावातील आजी माजी पदाधिकारी यांनी शिवसेना अडचणीत असताना देखील शिवसेनेत प्रवेश करुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले व शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सक्षम व योग्य नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि शिवसेना उपनेते व सातारा जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांच्या नेतृत्वाखाली व ग्राहक संरक्षण कक्षाचे फलटण उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर (माऊली) चव्हाण यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटनेचे फलटण तालुका सदस्य विजय सुभेदार सूर्यवंशी, झिरपवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिगंबर नंदकुमार मदने, झिरपवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या रेखा नवनाथ गुंजवटे व महेंद्र शिवाजी गुंजवटे यांनी मुंबई येथील दिवाकर रावते यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात दि. 14 सप्टेंबर 2022 रोजी शिवबंधन बांधुन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते हे देखील तिथे उपस्थिते होते अशी माहिती शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी दिली.

शिवसेना सातारा जिल्हा समन्वयक व माजी आमदार दगडू दादा सपकाळ आजारी असल्यामुळे या प्रवेशावेळी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या लालबाग येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करुन सर्वांनी त्यांचे आशिर्वाद व मार्गदर्शन घेतले. यावेळी दगडू दादा व शिव आरोग्य सेनेचे पदाधिकारी जितेंद्र सपकाळ यांनीही सर्वांचे कौतुक केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, उपजिल्हा प्रमुख अमोल आवळे, फलटण-कोरेगाव विधानसभा संपर्क प्रमुख प्रमोद माने, सहसंपर्क प्रमुख संभाजीराव जगताप, विधानसभा संघटक विठ्ठलराव गायकवाड यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व नवनिर्वाचित शिवसैनिकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

झिरपवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सतीश चव्हाण, अशोक गुंजवटे, रोहिदास गुंजवटे, तसेच झिरपवाडी येथील शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक यांनी सदर प्रवेशासाठी दिलेले मोलाचे योगदान याबाबत नवनिर्वाचित शिवसैनिकांकडून सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News