सेनगाव शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील नालीचे पाणी मुख्य रस्त्यावर सांडपाणी येत असल्यामुळे नाली मधील मध्ये घाण कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नालीत जीव जंतू तयार होऊन डासाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे यामुळे मोठ्या प्रमाणात सेनगाव शहरातील नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे सेनगाव शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील आप्पास्वामी मंदिर परिसरात नगरसेवक यांनी मुख्य रस्त्यावर येत असेलले नालीचे सांडपाणी नालीत साचलेले घाण पाणी स्वतः एका डब्यामध्ये नगरपंचायत प्रशासनास तात्काळ त्यांना दाखवून जाब विचारला व खडे बोल सुनावले असून सेनगाव नगरपंचायत कर्मचाऱ्यास् धारेवर धरले असून नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे लवकरात लवकर दूषित सांड पाण्याची विल्हेवाट लावावी अन्यथा चार दिवसानंतर मीच हे घाण पाणी नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर टाकेल असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे
प्रतिनिधी रवि गवळी