निघालेला व्रज्वलेप लवकर लावावा अन्यथा विश्व वारकरी सेनेच्या वतीने आमरण ऊपोषोन करण्यात येईल:ह.भ.प.गणेश महाराज शेटे(संस्थापक अध्यक्ष विश्व वारकरी सेना)
पंढरपूर - संपूर्ण भारताचे आराध्य दैवत व दक्षिण काशी असणारे श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये श्री विठ्ठलाच्या व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीझ होऊ नये म्हणून गेल्या एक वर्षापूर्वी त्या मूर्तीस व्रज्वलेप करण्यात आला होता. पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार व त्यांच्या सर्व देखरेखी खाली हा व्रज्वलेप करण्यात आला होता. पण एक वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच श्री क्षेत्र पंढरपूर येथील मंदिरातील रुक्मिणी मातेच्या पायाचा व्रज्व लेप निघाला होता आणि गेल्या दोन महिन्याच्या आधी रुक्मिणी मातेच्या पायाला व्रज्व लेप लावण्यात आला पण आता पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायाची झीज डाव्या बाजूच्या पायाचे थोडे थोडे टवके निघाले असल्यामुळे श्री पांडुरंगाच्या मूर्तीची झीज पुन्हा एकदा सुरू होण्यास सुरुवात झाली आहे.
यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने या सर्व गोष्टीकडे रीतसर लक्ष देऊन व पुरातत्त्व विभागाच्या निदर्शनास या गोष्टी आणून देऊन ही होणारी झीझ त्वरित थांबवावी व श्री क्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या सर्व वारकरी भावीक भक्तांच्या भावनांशी होणारा खेळ थांबवावा या आशयाचे निवेदन विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये श्री पुदलवार साहेब यांना देण्यात आले
याचबरोबर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील श्री पांडुरंगाच्या मूर्तीचा छायाचित्र काढण्याची परवानगी आम्हास मिळावी अशी मागणी यावेळी हभप गणेश महाराज शेटे यांनी केली आहे पण फोटो काढण्यास परवानगी देण्यात आली नाही
एवढा खर्च करून लावलेला जर व्रज्वलेप सहजासहजी निघत असेल तर हा भाविकांच्या भावनेशी चालू असलेला खेळत म्हणावा लागेल म्हणून निवेदनाद्वारे समितीस विनंती करण्यात आली की त्वरित व्रज्वलेप लावण्यात यावा
येत्या नवरात्र उत्सवामध्ये (घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशीच)विश्व वारकरी सेनेच्या* *संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वारकरी बांधवांना व सर्व भाविक भक्तांना सोबत घेऊन नामदेव पायरीच्या जवळ उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला
यावेळी विश्व वारकरी सेनेचे, संस्थापक अध्यक्ष हभप. गणेश महाराज शेटे, ह भ प तुकाराम महाराज भोसले हभप. महादेव म. इंगोले,हभप. गजानन म. दहीकर,हभप. संतोष म. वाघोळकर, हभप. नामानंद म. जाधव,हभप. माऊली म. सुरडकर,हभप. हरिभाऊ म. लोंढे,हभप. नानासाहेब म.पाटील,हभप सुरेश म.बडे,हभप.गीतांजलीताई अभंग, हभप. सुरेंद्र महाराज नागपूरकर आदि सर्व मान्यवर उपस्थित होते.
या विठ्ठल मूर्तीची जर झीझ लवकरात, लवकर पंढरपूर येथील मंदिर समितीने व प्रशासनाने न थांबविल्यास येणाऱ्या काळामध्ये विठ्ठल मंदिराच्या सर्व प्रशासनाला घेराव घालून, मोठ्या प्रमाणात आंदोलनाच्या उपोषणाच्या मार्गाने आम्ही आमचा न्याय मागणार आहे!
हभप:-गणेशमहाराज शेटे, पंढरपूर