ह.मंगेवाडी प्रतिनिधी :आबासाहेब
शेवाळे
सांगोला तालुक्यातील हटकर मंगेवाडी या गावामध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आरो फिल्टर च्या पाण्याचा अखेर तिढा सुटला आणि आज शुभारंभाचा नारळ ही फोडण्यात आला.
बऱ्याच दिवसांपासून गावातील लोकांना फिल्टरचे पाणी नसल्याने नसल्याने पोटाचे विकार व आजाराचे प्रमाण वाढत असल्याने अखेर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गावामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी आरो फिल्टर पाण्याची अखेर आज शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित गावचे सरपंच जगन्नाथ भुसनर, दिलीप सुतार ,नामदेव पाटील ( ग्रामपंचायत सदस्य), महादेव भुसनर, अंकुश शेवाळे, सुनील खांडेकर, महादेव सुतार, दादासाहेब पाटील, अण्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते