Type Here to Get Search Results !

सोलापूर | तंबाखू विरोधी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वर दंडात्मक कारवाई




तंबाखू विरोधी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वर दंडात्मक कारवाई सोलापूर - 

दिनांक (1 ऑगस्ट)
सोलापूरात तंबाखू विरोधी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पान टपरी धारकांवर धडक कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. पोलीस प्रशासन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्या कोटपा कायदा 2003 अंमलबजावणी पथकाने ही कारवाई केली.




      कोटपा कलम चार अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवायामध्ये जेलरोड पोलीस चौकी परिसरातील पान टपरी धारकांकडून दंड वसूल करण्यात आला. 
या कारवाया पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर डॉ. वैशाली कडूकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले व जेल रोड पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मोगल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. 
या पथकामध्ये तंबाखू नियंत्रण कक्ष सोलापूर येथील समुपदेशिका श्रीमती .मंजुश्री मुळे, सामाजिक कार्यकर्ते श्री अमित महाडिक व पोलीस कॉन्स्टेबल यसलवाड यांचा समावेश होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad