Type Here to Get Search Results !

"खड्यात गेला कोंढवा'' नागरिक त्रस्त अधिकारी मस्त




"खड्यात गेला कोंढवा'' नागरिक त्रस्त अधिकारी मस्त

आज रोजी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप संघटनेमार्फत रस्त्यावरील खड्यात वृक्षरोपण करून निषेध करण्यात आला कोंढवा परिसरात अनेक वर्षांपासून सांडपाणी, ड्रेनेज गळती, त्याच बरोबर रस्त्यावर पडलेले खड्डे त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि येथील माजी नगरसेवकांनी विकास कामाची दिलेली आश्वासने पाण्याची टाकी, लायब्ररी, प्रसूती गृह, तसेच मुस्लिम समाजासाठी हज हाऊस, बायपास रस्ता ही आश्वासने खोटी सिद्ध झाल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी यावेळी सांगितले.




आज कोंढवा परिसरात रस्त्यांची परिस्थिती इतकी भयानक झाली असून नागरिकांना येता जाता वाहतूकीच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे, यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर जाता येत नाहीये, अशी परिस्थिती कोंढवा परिसरात निर्माण झाल्याची माहिती देखील समोर आली आहे काही दिवसांपूर्वी याच खड्यात एक तरुणाचा अपघात होऊन जखमी झाल्याचे देखील यावेळी नागरिकांकडून सांगण्यात आले 




अशा निष्कृष्ट दर्जाचे काम आणि इतर कामाकडे केलेला कानाडोळा या सर्व बाबी नागरिकांच्या ध्यानी असून येणार काळात येथील माजी नगरसेवकांवर भारी पडणार असल्याचे दिसून येत आहे




यासाठी इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुपच्या वतीने इतर संगठनांना सोबत घेऊन 'रस्त्यावर वृक्षारोपण आंदोलन' करण्यात आले खड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात "होडी" सोडून निषेध करण्यात आला तेथील उपस्थित नागरिकांना त्या ठिकाणी असलेल्या खड्यांमुळे होणाऱ्या समस्येवर माहिती घेण्यात आली, माहितीमध्ये असे समजून आले की, खड्यांमुळे अनेक नागरिकांचा अपघात देखील झाला आहेत आणि या खड्यांमध्ये साठलेल्या पाण्यावर डेंगू चे मच्छर, किटाणू, यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यामुळे नागरिकांचा आक्रोश त्या ठिकाणी दिसून आला.




 'कोंढाव्यातील माजी नगरसेवक तुपाशी तर नागरिक उपाशी' अशी गत येथील नागरिकांची झाली आहे प्रशासन याकडे लक्ष देईल की नाही यावर लक्ष टिकून राहिले आहे यावेळी उपस्थित सहकारी इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप संस्थेचे अध्यक्ष असलम इसाक बागवान ,शहबाज पंजाबी, छबिल पटेल, सचिन आल्हाट निखिल जाधव, समीर मुल्ला, शहेबाज पंजाबी, पीर पाशा, ऋषिकेश गायकवाड, गणेश भालेराव, इरफान पप्पू मुलाणी, बागवान ,रियाज मुल्ला इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News