Type Here to Get Search Results !

नगरसेवक व गट नेते मा.आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसानिमित्त देवा लवटे यांचा लेख




नगरसेवक व गट नेते मा.आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसानिमित्त देवा लवटे यांचा लेख

विचार दमदार पक्का इमानदार
माणूस हाय लय भारी..
गरीबाची तो ढाल बनुनी...
सेवा जनतेची करणार...!
सांगोले शहरात नाव
गाजे आनंदा (भाऊ) मानेंच..!




वयाने माझ्यापेक्षा बरेच मोठे परंतु जीवाला जीव देणारे जिवलग आपला माणुस , सदैव संपर्कात असणारे ,बर्याच बाबतीत माझे खास सल्लागार , यांना मी जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा तेव्हा नवीन काहीतरी शिकतो , राजकारण ते युवाउद्योजक अशी यशस्वी घौडदौड असणारे
आमचे आनंद(भाऊ)....

तसेच अतिशय कमी वेळात सांगोला शहराच्या राजकारणात स्वत: च अस्तित्व निर्माण करणारा जिगरी आपला माणूस
आनंद (भाऊ)...

माणूसकिच्या गावगाड्यावर व शहरात जीवन जगत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय ही भावना सतत मनात ठेवणारे आपल्याला आपलं म्हणणारा आनंद (भाऊ) माझ्यासाठी युथ आयडॉलचं..!
            
जीवनाच्या वाटेवर जागोजागी संकटरूपी चिवट अडथळे यावेत त्यातुनही आज तो लंका पार करेंगे ही ही असं मनालाच पुटपुटत अगदी एखाद्या अश्वमेधाप्रमाणे धावावं असं *नेतृत्व म्हणजेच आनंद (भाऊ) मेंबर

  आभाळमाया आपल्यावर कृपादृष्टी करत बरसतं असावी स्वच्छंद आणि तितकाच संकटाच्या कचाट्यात सापडलेला हा निरव निरागस आणि तितकाच नितळ मनाचा हा देह फुलून यावा अगदी भट्टीतल्या आरासारखा अन् ऐनसांजेला फुललेल्या ब्रम्हकमळासारखं व्यक्तिमत्त्व आपला माणुस मेंबर आनंद (भाऊ)

निर्जिव वस्तुंनी बोलतं व्हावं अन् नुसतं बोलतंच नाहीतर चालतंही व्हावं आपल्या अश्वमेधाच्या मार्गक्रमण करण्याच्या त्या अवघड वाटेतून त्या चालत्याबोलत्या निर्जिव जिनसांनी अगदी पालापाचोळा भरकन उडून जावा तसं कडेला हटावं असं तुफानी व्यक्तिमत्व आपला हक्काचा माणुस मा.श्री आनंद (भाऊ) माने मेंबर

 भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपणास सुख समृद्धी आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना..!

आपलाच
 देवा लवटे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News